Kolhapur Crime : मद्यपी मुलाकडून आई-वडिलांवर कोयत्याने हल्ला

चंदगड पोलिसांत गुन्हा दाखल
Crime News
Crime NewsPudhari Photo
Published on
Updated on

चंदगड : मद्यपी तरुणाने आई-वडिलांवर कोयत्याने हल्ला चढवत गंभीर जखमी केल्याची घटना सातवणे (ता. चंदगड) येथे बुधवारी (दि. २९) सायंकाळी सात वाजता घडली. याप्रकरणी दशरथ सुरेश पारसे (वय ३०, रा. चाळोबा मंदिर जवळ, सातवणे) या तरुणावर चंदगड पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

सुरेश शंकर पारसे (वय ६१) व नंदा सुरेश पारसे (वय ५५) असे जखमी झालेल्यांची नावे आहेत. राहत्या घरातील देवघरात दशरथ झोपला होता. यावेळी नंदा यांना दारूचा वास येत असल्याचे त्यांनी पती सुरेश यांना सांगितले. हे संभाषण ऐकून दशरथ चिडला. यादरम्यान दशरथ याने अश्लील शिवीगाळ करत देवघरात ठेवलेला कोयता घेऊन प्रथम वडील सुरेश यांच्या डोकीवर वर्मी घाव घातला. त्याचवेळी दसरथ याला सोडवून घेण्यासाठी गेलेल्या त्यांच्या आई नंदा पुढे सरसावल्या. यावेळी दशरथ याने नंदा यांच्या उजव्या हाताच्या पंजावर कोयत्याने हल्ला चढवला. घटनास्थळी दोघेही रक्तबंबाळ झाले. यानंतर चंदगड येथे ग्रामीण रुग्णालयात दाखल करून अधिक उपचारासाठी गडहिंग्लज येथे व त्यानंतर नागणवाडी फाटा येथील खासगी रुग्णालयात जखमी दाम्पत्यावर उपचार सुरू आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news