Nagala Park drug trafficking | नागाळा पार्क, आरटीओ ऑफिस परिसरात अमली पदार्थांची तस्करी

Drug Smuggling Case
Nagala Park drug trafficking | नागाळा पार्क, आरटीओ ऑफिस परिसरात अमली पदार्थांची तस्करीPudhari File Photo
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नागाळा पार्क, वारणा कॉलनी, एस.टी. कॉलनी परिसरासह मैदानावर अमली पदार्थांची सर्रास तस्करी होत आहे. या प्रकारामुळे वादावादी, मारामारीच्या घटना घडत आहेत. या कृत्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी गस्त सुरू करावी, अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने सोमवारी शाहूपुरी पोलिसांकडे करण्यात आली.

जिल्हा संघटक इंद्रजित घाटगे यांनी पोलिस निरीक्षक संतोष डोके यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, नागाळा पार्क परिसरातील वारणा कॉलनी, एस.टी. कॉलनी येथील जीर्ण व बंद अवस्थेत असलेल्या इमारतीमध्ये शिवाय मोकळ्या जागेमध्ये अमली तस्करांचा वावर वाढला आहे. 17 ते 25 वयोगटातील तरणी पोरं भरदिवसा नशा करताना दिसून येतात. रात्रीच्या सुमारासही तस्करांसह सराईत गुन्हेगारांची वर्दळ दिसून येते.

नशेल्या तरुणांना हुसकावून लावताना वादावादीसह अंगावर धावून येण्याचे प्रकार घडत आहेत. परिसरात राहणार्‍या नागरिकांना त्याचा त्रास होत आहे. तस्करीविरुद्ध पोलिसांनी व्यापक मोहीम सुरू करावी, अशी मागणी होऊ लागली आहे. तस्करांच्या कारनाम्यांची पोलिस यंत्रणेने गंभीर दखल घेऊन कायदेशीर कारवाईचा बडगा उगारावा, अशी मागणीही घाटगे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी केली आहे. पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनाही निवेदन देण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.