Drug Trafficking Case | कमी वेळेत जादा कमाईसाठी अमली पदार्थांची तस्करी

तरुणास अटक; चरस, गांजा जप्त
Drug Trafficking Case |
Drug Trafficking Case | कमी वेळेत जादा कमाईसाठी अमली पदार्थांची तस्करी
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : कमीत कमी वेळेत जादा पैसे कमावण्याच्या नादात गोव्याहून अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या एकास स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून ५२ ग्रॅम चरस, १५ ग्रॅम एम.डी. ड्रग्ज, मोपेड असा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला. माजीद जावेद जामदार (वय २१, रा. यादवनगर) असे त्याचे नाव आहे. शास्त्रीनगर चौकात सापळा रचून ही कारवाई केली.

एक तरुण अमली पदार्थांची गोव्याहून तस्करी करून कोल्हापुरातील शास्त्रीनगरात विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिस अंमलदार वैभव पाटील, संदीप सावंत यांना मिळाली होती. त्यांनी शास्त्रीनगर चौकात सापळा रचून मोपेडवरून आलेल्या तरुणास ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता, मोपेडच्या डिक्कीत चरस, एमडी ड्रग्ज आढळून आले.

झटपट कमाईच्या नादात अमली पदार्थांची तस्करी

संशयित माजीद जामदारने गोव्यातून एमडी आणि चरसची तस्करी केल्याची कबुली दिली. त्याचे वडील मजुरीचे काम करतात. आई गृहिणी आहे. माजीद काही काम करत नसून त्याने झटपट कमाईसाठी अमली पदार्थ विकण्याचा फंडा अवलंबला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news