Gram Panchayats | 433 ग्रामपंचायतींची प्रारूप प्रभाग रचना आज समजणार

13 एप्रिलपर्यंत हरकती; 4-5 मे रोजी अंतिम प्रभाग जाहीर
Gram Panchayats | 433 ग्रामपंचायतींची प्रारूप प्रभाग रचना आज समजणार
Published on
Updated on

कोल्हापूर : जिल्ह्यातील जानेवारी ते डिसेंबर 2026 या वर्षातील मुदत संपणार्‍या 433 ग्रामपंचायतींची रणधुमाळी सुरू झाली आहे. या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना करण्यात आली आहे. त्यानुसार प्रारूप प्रभाग मंगळवारी (दि.7) प्रसिद्ध केले जाणार आहेत.

नगरपालिका, महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर आता ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा धुरळा लवकरच उडणार आहे. मे अखेर अथवा जून महिन्यात निवडणुकांची शक्यता आहे. या कालावधीत त्या झाल्या नाहीत तर पावसाळ्यानंतर सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये या 433 ग्रामपंचायतींसाठी मतदान होण्याची दाट शक्यता आहे. त्याची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहे.

हरकतींसाठी 5 दिवसांचा कालावधी

प्रारूप प्रभाग रचनेवर दि. 7 ते 13 या सात दिवसांत हरकती घेता येणार आहेत, सूचना करता येणार आहे. दाखल हरकतींवर 16 पर्यंत सुनावणी घेतली जाणार आहे. यानंतर 4 व 5 मे रोजी अंतिम प्रभाग रचना जाहीर केली जाणार आहे. मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतींत करवीर तालुक्यातील सर्वाधिक 54 ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news