डॉ. योगेश जाधव यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव

विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून अभीष्टचिंतन
Dr. Yogesh Jadhav birthday wishes
कोल्हापूर : ‘पुढारी’ माध्यम समूहाचे चेअरमन डॉ. योगेश जाधव यांच्यावर सोमवारी वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव झाला. विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी ‘पुढारी भवन’ येथे येऊन डॉ. जाधव यांना शुभेच्छा दिल्या. राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी डॉ. जाधव यांचे अभीष्टचिंतन केले. Pudhari File Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : ‘पुढारी’ माध्यम समूहाचे चेअरमन डॉ. योगेश जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी त्यांना विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. ‘पुढारी’ माध्यम समूहाच्या यशस्वी घोडदौडबाबत गौरवोद्गार काढत समूहाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतानाच मान्यवरांनी डॉ. जाधव यांचे अभीष्टचिंतन केले. ‘पुढारी’ कार्यालयात येऊन राजकीय, सामाजिक, विधी, वैद्यकीय, क्रीडा, साहित्यिक, पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

दै. ‘पुढारी’च्या 86 वर्षांच्या यशस्वी वाटचालीत ‘पुढारी’ने दीड वर्षापूर्वी सुरू केलेल्या ‘पुढारी न्यूज’ या टी.व्ही. चॅनलने ‘पुढारी’ माध्यम समूहाला 360 अंशातील माध्यमाचे रूप दिले. ‘मीडिया अंडर वन रूफ’ ही संकल्पना यशस्वी करणार्‍या डॉ. जाधव यांचे यावेळी मान्यवर कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा देत होते. सनई-चौघड्याचे मंजूळ स्वर, ‘पुढारी भवन’समोर उभारलेला भव्य शामियाना आणि सर्वच क्षेत्रांतील मान्यवरांची मांदियाळी अशा उत्साही वातावरणात डॉ. जाधव यांचा वाढदिवस साजरा झाला.

राज्याचे आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी निवासस्थानी येऊन डॉ. योगेश जाधव यांचे अभीष्टचिंतन केले. ‘पुढारी भवन’ येथे राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार अमल महाडिक, आमदार राहुल आवाडे, आमदार डॉ. अशोकराव माने, जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., जिल्हा पोलिसप्रमुख महेंद्र पंडित, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, कोल्हापूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, ‘गोकुळ’चे अध्यक्ष अरुण डोंगळे, भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, शहराध्यक्ष आदिल फरास, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, शहर अध्यक्ष आर. के. पोवार, शिवसेना ठाकरे पक्षाचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, शहरप्रमुख रविकिरण इंगवले, काँग्रेसचे शहर अध्यक्ष सचिन चव्हाण आदींनी शुभेच्छा दिल्या.

कोल्हापूर : पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी निवासस्थानी येऊन डॉ. जाधव यांना शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा देताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, आमदार चंद्रदीप नरके.
कोल्हापूर : पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी निवासस्थानी येऊन डॉ. जाधव यांना शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा देताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, आमदार चंद्रदीप नरके.

याशिवाय जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिशिर मिरगुंडे, डॉ. अपराजित वालावलकर, बंटी सावंत, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा वित्त अधिकारी अतुल आकुर्डे, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. मीना शेंडकर, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सचिन सांगावकर, मुख्यमंत्री सडक योजनेचे प्रदीप सकटे, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष सचिन जाधव, लेखाधिकारी संजय शिंदे, ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष विश्वास पाटील, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती अ‍ॅड. प्रकाश देसाई, सचिव जयवंत पाटील, अधिकारी अमित पाटील, ‘गोकुळ’चे जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, संग्रामसिंह मगदूम, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, माजी नगरसेवक प्रकाश गवंडी, अर्जुन माने, उत्तम कोराणे, राजसिंह शेळके, ईश्वर परमार, रमेश पोवार, दिलीप पोवार, निशिकांत मेथे, रमेश पुरेकर, सुभाष रामुगडे, रियाज सुभेदार, तौफिक मुल्लाणी.

शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर, कोल्हापूर विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. धनराज नाकाडे, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सीईओ कौस्तुभ गावडे, कोल्हापूर बोर्डाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठचे अध्यक्ष एस. डी. लाड, चाटे शिक्षण समूहाचे कोल्हापूर विभागीय संचालक डॉ. भारत खराटे, प्रा. मधुकर पाटील, प्राचार्य डॉ. जे. के. पवार, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे, विभागीय अध्यक्ष महादेव डावरे, राज्य सचिव शिवाजी भोसले, शहराध्यक्ष आप्पासाहेब वागरे, खासगी शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन मच्छिंद्र नाळे, संचालक सर्जेराव नाईक, दि प्राथमिक शिक्षक बँकेचे सीईओ संजयकुमार मगदूम, लेखापाल संतोष काळे, अल्ताफ सय्यद, राहुल सुतार, राज्यमान्य खासगी प्राथमिक शिक्षक महासंघाचे राज्य सचिव राजेंद्र कोरे, अभिजित साळोखे, नितीन पानारी, दस्तगीर मुजावर, संतोष पाटील, महापालिका प्राथमिक शिक्षण समितीचे प्रकल्प अधिकारी रसूल पाटील, शांताराम सुतार, शिवाजी विद्यापीठ आजी-माजी कृती समितीचे संस्थापक डॉ. प्रवीण कोडोलीकर, युवासेनेचे शहराध्यक्ष अ‍ॅड. मंदार पाटील, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अभिजित राऊत, अजिंक्य शिंदे, नितेश गणेशाचार्य.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर, सहायक पोलिस निरीक्षक शेष मोरे, नामदेव गावडे, जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजीव झारे, सहायक निरीक्षक संतोष गळवे, शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संतोष डोके, तानाजी चौगले, लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्रीराम कन्हेरकर, उपनिरीक्षक दादू देठे, भगवान गिरीगोसावी, हवालदार संजय कोळी, शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक नंदकुमार मोरे, महावितरणचे मुख्य अभियंता स्वप्निल काटकर, मोटार वाहन निरीक्षक शंभूराजे पवार, कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. सर्जेराव खोत, महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. महादेवराव आडगुळे, अ‍ॅड. शिवाजीराव राणे, अ‍ॅड. धनंजय पठाडे, अ‍ॅड. गिरीश नाईक, अ‍ॅड. रणजित गावडे, अ‍ॅड. गिरीश खडके, अ‍ॅड. संपतराव पवार-पाटील, अ‍ॅड. प्रमोद दाभाडे, शंतनू मोहिते. ‘आस्मा’चे अध्यक्ष सुनील बासराणी, उपाध्यक्ष प्रशांत कुलकर्णी, सेक्रेटरी संजीव चिपळूणकर, अभय मिराशी, अमरदीप पाटील, संजय रणदिवे, राजीव परुळेकर, विवेक मंद्रुपकर, सुनील बनगे, सुहास लुकतुके, व्यापारी आघाडीचे अध्यक्ष संतोष आप्पा लाड, भाजप लक्ष्मीपुरी मंडल अध्यक्ष विशाल शिराळकर, सामाजिक कार्यकर्ते मिलिंद कणसे, शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र पाटील. उद्योगपती दिलीप मोहिते, ‘तनिष्क’चे प्रसाद कामत, विश्वजित खानविलकर, लोकमान्य सोसायटीचे प्रदीप पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विक्रम पाटील, उद्योजक अरुण सोनवणे, अ‍ॅग्रीबोट ड्रोनचे राहुल मगदूम, शिवाजी विद्यापीठ सेवक संघाचे अध्यक्ष मिलिंद भोसले, उपाध्यक्ष संजय पोवार, सचिन नाळे, अनिल गायकवाड, रेशन धान्य दुकानदार असासिएशनचे अध्यक्ष रवी मोरे, राष्ट्रवादी अजित पवार गट महिला आघाडीच्या जाहिदा मुजावर, पूजा साळुंखे, सुनीता राऊत, अल्का चव्हाण, मीरा मोरे, सुप्रिया साळी, रेहाना नागरकट्टी, शहनाज शेख, श्वेता बडोदेकर, आयेशा खान, साहिली भोसले, सोनाली कांदवली, उद्योगपती दिलीप मोहिते, प्रसाद कामत, विश्वविजय खानविलकर, पांडुरंग पतसंस्था चेअरमन जहाँगीर अत्तार, व्हा. चेअरमन अशोक शेवडे, अर्जुन पाटील, अर्बन बँकेचे संचालक विश्वासराव काटकर, केएसएचे सचिव माणिक मंडलिक, भाऊ घोडके आदींनी शुभेच्छा दिल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news