kolhapur | डॉ. विजय राठोड नवे जिल्हाधिकारी, डॉ. राजेंद्र भारूड मनपा आयुक्त

new district collector, municipal commissioner appointment
kolhapur | डॉ. विजय राठोड नवे जिल्हाधिकारी, डॉ. राजेंद्र भारूड मनपा आयुक्त
Published on
Updated on

कोल्हापूर : जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. या तिन्ही अधिकार्‍यांच्या गुरुवारी बदल्या झाल्या.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड यांची कोल्हापूरचे जिल्हाधिकारी म्हणून, तर राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानाचे प्रकल्प संचालक डॉ. राजेंद्र भारूड यांची महापालिका आयुक्त म्हणून आणि रत्नागिरीच्या सहायक जिल्हाधिकारी डॉ. जॅसमिन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून येणार आहेत. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे आयुक्त, के. मंजुलक्ष्मी यांची पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात अतिरिक्त आयुक्त, तर कार्तिकेयन एस. यांची सोलापूर जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news