कोल्हापूर : विधानपरिषद पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत भाजप महायुतीच्या अधिकृत उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव यांनी गुरुवारी कोल्हापुरात पदवीधर तसेच शिक्षक मतदारांशी संवाद साधत प्रचाराचा जोरदार धडाका उडवून दिला.
दौऱ्याची सुरुवात त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक प्रफुल्ल ऊर्फ आप्पा जोशी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन केली. याप्रसंगी त्यांचे चिरंजीव तथा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग कार्यकारिणी सदस्य केदार जोशी, त्यांच्या घरातील सर्व सदस्य, भाजप जिल्हाध्यक्ष विजय जाधव, विराज चिखलीकर, आप्पा लाड, अमर साठे, सुधीर देसाई, किरण कुलकर्णी, गंगा कलीकते उपस्थित होते. त्यानंतर डॉ. जाधव यांनी भवानी मंडप येथे शेतकरी सहकारी संघाच्या कार्यालयास भेट दिली. या ठिकाणी चेअरमन ॲड. दत्तात्रय राणे, संचालक अजितसिंह मोहिते, कार्यकारी संचालक समीर नाळे, संचालक राजसिंह शेळके, रघुनाथ फराकटे, शंकर फराकटे, विलास राणे, भाजप जिल्हाध्यक्ष विजय जाधव, विराज चिखलीकर, अमर साठे, पदवीधर नोंदणी प्रमुख आप्पा लाड, सुधीर देसाई यांच्यासह शेतकरी संघाच्या महिला कर्मचारी तसेच इतर सर्व स्टाफ उपस्थित होता.
दि कोल्हापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. कोल्हापूर येथे अध्यक्ष शिरीष कणेरकर, संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांची भेट घेऊन संवाद साधला. यावेळी उपाध्यक्ष जयसिंगराव माने, संचालक राजन भोसले, नंदकिशोर मकोटे, मधुसुदन सावंत, सीए सचिन कुलकर्णी, दीपक चव्हाण आणि बँकेचे कर्मचारी उपस्थित होते. यानंतर शाहूपुरी येथील जनता सहकारी बँक लिमिटेड, पुणे शाखेला भेट दिली. यावेळी शाखा व्यवस्थापक समीर सरदेसाई, राजेंद्र येसणे, चंद्रकांत माने, मोहन पोतदार, अभिषेक करंदीकर, ऋषीकेश जोशी, दर्शन कुलकर्णी, श्रीपाद शास्त्री, सौरभी मांगलेकर, स्वानंदी सबनीस, रतन कांबळे, आदित्य काणे, सुनील उत्तुरकर, अभिषेक प्रभुदेसाई, श्रद्धा औंधकर, पल्लवी आणि बँकेचे इतर कर्मचारी उपस्थित होते. पुढे त्यांनी दि कमर्शियल को-ऑपरेटिव्ह बँक लि. कोल्हापूर येथेही अध्यक्ष अतुल शाह तसेच संचालक व इतर पदाधिकाऱ्यांची प्रचारार्थ भेट घेतली.
या दौऱ्यात डॉ. जाधव यांनी शाहूपुरी येथील चाटे समूह व विद्याप्रबोधिनी येथेही शिक्षक व पदवीधरांशी संवाद साधला. समूहाचे विभागीय संचालक प्रा. डॉ. भारत खराटे, कल्पना निंबाळकर, बाबा साळुंखे, विजय जाधव, विराज चिखलीकर, प्रा. मधुकर पाटील, विद्याप्रबोधिनीचे राजकुमार पाटील आणि लव्हटे सर यांच्यासह अनेक मान्यवर व शिक्षक उपस्थित होते. तसेच ताराराणी विद्यापीठाचे प्रमुख प्राचार्य क्रांतिकुमार पाटील यांची भेट घेऊन शिक्षण क्षेत्रातील विविध विषयांवर त्यांनी चर्चा केली.
यानंतर त्यांनी ताराराणी विद्यापीठ येथेही प्राचार्य क्रांतिकुमार पाटील, प्रा. तेजस्विनी मुडेकर, सचिव प्राजक्त पाटील, पदवीधर मित्र संघटनेचे अध्यक्ष माणिक पाटील-चुयेकर, डॉ. सुजय पाटील, प्रा. विश्वनाथ तराळ, प्रा. रंगापुरे, दुर्गेश लिंग्रस, शिवसेना पदाधिकारी यांची भेट घेतली. या संपूर्ण दौऱ्यात भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
त्यानंतर शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश के. कामत यांची डॉ. जाधव यांनी सदिच्छा भेट घेतली. याशिवाय शिवाजी विद्यापीठ सेवक संघाचे अध्यक्ष मिलिंद भोसले, उपाध्यक्ष सतीश कुसुंबे, सचिव चंद्रशेखर कदम यांच्यासह सेवक संघाचे सर्व पदाधिकारी व सभासद उपस्थित होते. तसेच, महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे अध्यक्ष आनंद खामकर, दिनेश उथळे, प्रकाश श्रावस्थी, उदय पोवार व इतर पदाधिकाऱ्यांशीही त्यांनी सविस्तर चर्चा केली. या दौऱ्यादरम्यान सर्वच क्षेत्रांतील मान्यवर, पदाधिकारी आणि मतदारांनी डॉ. स्मिता जाधव यांच्या पाठीशी उभे राहून प्रचंड मतांनी विजयी करण्याचा निर्धार व्यक्त करत त्यांना उत्स्फूर्त पाठिंबा दिला.