‘Brand Kolhapur’ program | कोल्‍हापूरचा झेंडा पुढील पिढ्यांनी संपूर्ण विश्‍वात नाचवावा : डॉ. विश्‍वास पाटील

‘ब्रँड कोल्हापूर’मध्ये डॉ. शरद भुताडिया, डॉ. वसंतराव मोरे यांना ‘जीवनगौरव’ प्रदान
कोल्‍हापूर : ब्रँड कोल्‍हापूर पुरस्‍कार सोहळ्यात विविध मान्‍यवरांना डॉ. विश्‍वास पाटील आणि आमदार सतेज पाटील यांच्‍या हस्‍ते गौरविण्‍यात आले.
कोल्‍हापूर : ब्रँड कोल्‍हापूर पुरस्‍कार सोहळ्यात विविध मान्‍यवरांना डॉ. विश्‍वास पाटील आणि आमदार सतेज पाटील यांच्‍या हस्‍ते गौरविण्‍यात आले. (छाया : नाज ट्रेनर)
Published on: 
Updated on: 

कोल्‍हापूर : कला, क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्‍कृतिक असा विविधांगी वारसा असणार्‍या कोल्‍हापूरचा झेंडा पुढील पिढ्यांनी संपूर्ण विश्‍वात नाचवावा, असे प्रतिपादन ‘पानिपत’कार डॉ. विश्‍वास पाटील यांनी केले. हॉटेल सयाजी येथे आयोजित ‘ब्रँड कोल्‍हापूर’ कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्‍हणून ते बोलत होते. यावेळी डॉ. शरद भुताडिया आणि डॉ. वसंतराव मोरे यांचा ‘ब्रँड कोल्‍हापूर जीवनगौरव’ पुरस्‍कार देऊन आमदार सतेज पाटील आणि डॉ. विश्‍वास पाटील यांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला.

डॉ. पाटील म्‍हणाले, छत्रपती शिवराय, राजर्षी शाहू महाराज यांच्‍या प्रेरणेने कोल्‍हापुरात विविध क्षेत्रांत रत्‍नांची खाण निर्माण झाली आहे. वाघाशी कुस्‍ती खेळणार्‍या महिलेचा सन्‍मान, बहुजनातील पहिल्या मॅट्रिक उत्तीर्ण पी. सी. पाटील यांची हत्तीवरून मिरवणूक हे कोल्‍हापूरचे वैशिष्‍ट्य आहे.

आ. सतेज पाटील म्‍हणाले, कोल्‍हापुरातील या पुरस्‍कार विजेत्‍यांच्‍या यशाच्‍या प्रकाशात नव्‍या पिढीतील तरुणांच्‍या जीवनातील अंधकार नष्‍ट व्‍हावा या हेतूने हा कार्यक्रम आहे. कोल्‍हापूरकरांनी माझा सन्‍मान केला हे त्यांच्या मोठ्या मनाचा भाग असल्‍याचे सांगून डॉ. भुताडिया म्‍हणाले, केवळ तरुणांना नव्‍हे तर वृद्धानाही प्रोत्‍साहन हवे असते त्‍यासाठी हा पुरस्‍कार महत्त्‍वाचा आहे. डॉ. वसंतराव मोरे म्‍हणाले, विविध भाषांतील छत्रपती शिवरायांच्‍या कर्तृत्‍वाचा अभ्‍यास करण्‍याची संधी मिळाली हे माझे भाग्‍य आहे. जेम्‍स लेनने शिवराय आणि जिजाऊ यांची प्रचंड बदनामी केली. मात्र, मराठ्यांनी ही बदनामी हाणून पाडण्‍याचे काम केले.

संदेश कुरळे, सोनम मस्‍कर यांना होस्‍ट ब्रॅंड, तर ब्रँड कोल्‍हापूर पुरस्‍कार रोहित मालवेकर, हर्षवर्धन पाटील, वैभवी चव्‍हाण, जुही धारवाडे, डॉ. नंदिता परांजपे-जोशी, डॉ. ऋषिकेश पोळ, डॉ. महेश शिंदे, पूजा पावसकर, शुभम सुतार, रोहित चव्‍हाण, अमृता पुजारी, सानिका माने, विश्‍वजित मोरे, शंभवी क्षीरसागर, जिजाऊ पाटील, मोनिका एकल, स्‍वप्‍नाली मगदूम, सई जाधव, जितेंद्र करंबे, वेदांती मनगुतकर, ऋषिकेश कबनूरकर, ऋतुजा गुरव, ऋषिकेश आलासे, प्रथमेश शिंदे, पांडुरंग फोंडे, मधुरिमा सावंत, गौरव पाटील, आदित्‍य जाधव, तन्‍वी मगदूम, देवेन पवार यांना देऊन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते त्यांचा गौरव केला.

अनुराधा सरनाईक यांनी स्‍वागत केले. प्राचार्य महादेव नरके यांनी सूत्रसंचालन केले. उदय गायकवाड आणि डॉ. अमर आडके यांनी पाहुण्‍यांचा परिचय करून दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.