Dr. R.K. Kamat | कुलगुरू डॉ. कामत यांनी पदभार स्वीकारला

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. आर.के. कामत यांनी प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्याकडून कुलगुरूपदाचा कार्यभार स्वीकारला.	दुसर्‍या छायाचित्रात नवनियुक्त कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी इलेक्ट्रिक वाहन स्वतः चालवत विद्यापीठाच्या प्रांगणातील महामानवांच्या पुतळ्यांना अभिवादन केले.
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. आर.के. कामत यांनी प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्याकडून कुलगुरूपदाचा कार्यभार स्वीकारला. दुसर्‍या छायाचित्रात नवनियुक्त कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी इलेक्ट्रिक वाहन स्वतः चालवत विद्यापीठाच्या प्रांगणातील महामानवांच्या पुतळ्यांना अभिवादन केले. (छाया : पप्पू अत्तार)
Published on
Updated on

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. आर.के. कामत यांनी शुक्रवारी सकाळी प्रभारी कुलगुरू तथा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्याकडून कुलगुरू पदाची सूत्रे स्वीकारली. यावेळी मावळत्या प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्यासह कामत कुटुंबिय उपस्थित होते.

डॉ. कामत यांनी सकाळी कुलगुरू निवासस्थानापासून विद्यापीठाच्या प्रांगणामधील सर्व प्रवास इलेक्ट्रीक वाहनातून केला. विशेष म्हणजे वाहनाचे सुकाणू त्यांनी स्वतःच हाती घेतले होते. त्यांच्यासोबत पत्नी, मुलगी व आत्या यांच्यासह कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे होते. डॉ. कामत यांनी सर्वप्रथम विद्यापीठाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्यास अभिवादन केले. कुलगुरू दालनामध्ये प्रभारी कुलगुरू डॉ. गोसावी यांच्याकडून त्यांनी कुलगुरू पदाची सूत्रे स्वीकारली. कुलसचिव डॉ. शिंदे यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. कार्यक्रमास परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, व्यवस्थापन परिषद सदस्य सिद्धार्थ शिंदे, स्वागत परुळेकर उपस्थित होते.

...या मान्यवरांचाही निरोप समारंभ

व्यवस्थापन परिषद सभागृहात प्रभारी कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी, विद्यापीठाच्या पहिल्या प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांचा औपचारिक निरोप समारंभ झाला. याप्रसंगी विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. राजाराम गुरव, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या प्रभारी अधिष्ठाता डॉ. वर्षा मैंदर्गी, मानवविज्ञान विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख व आंतरविद्याशाखा प्रभारी अधिष्ठाता डॉ. अजय साळी यांना निरोप देण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news