

कोल्हापूर : नि:पक्ष आणि निर्भीड पत्रकारितेचा स्वतंत्र मानदंड निर्माण करत, सार्वजनिक आणि सामाजिक क्षेत्रात आपल्या अलौकिक कर्तृत्वाचा ठसा उमटवत, सर्वसामान्य जनतेचा आवाज बनलेले दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्यावर मंगळवारी वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव झाला. डॉ. जाधव यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, प्रशासन आदी सर्वच क्षेत्रांतील मान्यवरांसह तमाम जनतेच्या वतीने त्यांचे अभीष्टचिंतन करण्यात आले.
डॉ. जाधव यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, त्यांचे सुपुत्र तेजस ठाकरे, खासदार शाहू महाराज, काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते आ. सतेज पाटील यांनी डॉ. जाधव यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे अभीष्टचिंतन करत त्यांना दीर्घायुष्य लाभो, अशा शुभेच्छा दिल्या. पुढारी माध्यम समूहाचे चेअरमन व दै. ‘पुढारी’चे समूह संपादक डॉ. योगेश जाधव यांनी सर्वांचे स्वागत केले. यावेळी डॉ. जाधव यांचे नातू ऋतुराज मंदार पाटील प्रमुख उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत रात्री डॉ. जाधव यांनी निवासस्थानी केक कापला. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस व पवार यांनी शाल परिधान करून डॉ. जाधव यांचे अभीष्टचिंतन केले. यानंतर डॉ. जाधव यांच्याशी त्यांनी राजकारणासह विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी राज्याचे तीनही प्रमुख नेते डॉ. जाधव यांच्याशी हास्यविनोदातही काही काळ रमून गेले होते.
सर्वसामान्यांचा आधारस्तंभ ठरलेल्या डॉ. जाधव यांना शुभेच्छा देण्यासाठी मंगळवारी सकाळी दहा वाजल्यापासूनच ‘पुढारी भवन’ येथे गर्दी झाली होती. सर्वच स्तरांतील मान्यवरांसह शुभेच्छांसाठी झालेल्या गर्दीने ‘पुढारी भवन’चा परिसर अक्षरश: फुलून गेला होता. डॉ. जाधव यांचे कोल्हापूरशी असलेले वर्षानुवर्षांचे अतुट नाते आणि कोल्हापूरकरांची डॉ. जाधव यांच्यावरील प्रेमाची वीण यानिमित्त आणखी घट्ट झाली. मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापण्यात आला. दिवसभर डॉ. जाधव यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू होता. वाढदिवसानिमित्त शुभेच्छांसाठी एकत्र आलेल्या सर्वच स्तरांतील मान्यवरांच्या मांदियाळीत ‘पुढारी भवन’ येथे कौटुंबिक आणि जिव्हाळ्याचा सोहळा रंगला. या सोहळ्याला झालेल्या गर्दीने डॉ. जाधव यांच्याविषयीची आपुलकी आणि जिव्हाळ्याचे दर्शन घडले.
खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार डॉ. विनय कोरे, आमदार राजेश पाटील, आमदार प्रकाश आवाडे, आमदार सदाभाऊ खोत, आमदार प्रा. जयंत आसगावकर, आमदार प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड, आ. मिलिंद नार्वेकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, राज्याच्या नियोजन विभागाचे प्रधान सचिव व विकास आयुक्त राजगोपाल देवरा, डॉ. डी. वाय. पाटील शिक्षण संस्थेचे प्रमुख संजय डी. पाटील, शाहू ग्रुपचे समरजित घाटगे, ‘गोकुळ’चे अध्यक्ष अरुण डोंगळे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, माजी खा. संजय मंडलिक, माजी आमदार के. पी. पाटील, माजी आमदार अमल महाडिक, चंद्रदीप नरके, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, जिल्हाप्रमुख संजय पवार, जनसुराज्य शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, राहुल आवाडे, अशोकराव माने, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, कृष्णराज महाडिक, सत्यजित कदम, प्रकाश गवंडी, आदिल फरास, राहुल चव्हाण, राजसिंह शेळके, आशिष ढवळे, दिलीप पोवार, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, जि. प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी, माजी नगरसेवक राजेश लाटकर, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, अ. भा. मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष वसंतराव मुळीक, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, कोल्हापूर विभागीय उच्चशिक्षण सहसंचालक डॉ. धनराज नाकाडे, जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे,
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश देसाई, गडहिंग्लजच्या माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी, जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सर्जेराव खोत, ईश्वर परमार, अजित ठाणेकर, दिलीप पोवार, बाबा पार्टे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जलअभियंता हर्षजित घाटगे, अॅड. धनंजय पठाडे, डॉ. प्रकाश संघवी, अभिजित मगदूम, जिल्हा क्रिकेट असो.चे माजी अध्यक्ष बाळ पाटणकर, साखर उद्योग तज्ज्ञ विजय औताडे, डॉ. चेतन नरके, राजू मेवेकरी, राजीव परुळेकर, शीतल भोसले, अंबाबाई मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे, जिल्हा जलतरण संघटनेचे अध्यक्ष आनंद माने, बांधकाम व्यावसायिक राजीव पारीख, नरेंद्र ओसवाल, राजेश ओसवाल, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील, प्रा. सी. एम. गायकवाड, चंद्रकांत चव्हाण, तनिष्कचे प्रसाद कामत, जय कामत, उद्योजक नितीन धूत, भाजपचे राहुल चिकोडे, महेश जाधव, विजय जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता तुषार बुरुड, कार्यकारी अभियंता रोहित तोंदले, उपअभियंता महेश कांजर, जि.प. माजी सदस्य शंकर पाटील, जिल्हा जलसंधारण अधिकारी स्वप्निल पवार, माधुरी बेकर्सचे चंद्रकांत वडगावकर, मनसेचे विजय करजगार, राजू दिंडोर्ले, अजिंक्य शिंदे, प्रसाद पाटील, कोल्हापूर इंजिनिअरिंग असो. सचिव प्रदीप व्हरांबळे,
आरोग्यदूत बंटी सावंत, विशाल सरनाईक, संग्राम सरनाईक, अॅड. बाबा इंदूलकर, महादेव पाटील, फिरोजखान उस्ताद, फुटबॉलचे डॉ. दीपक खांडेकर, कॉम—ेड रघुनाथ कांबळे, दिलीप पोवार, सतीशचंद्र कांबळे, जयकुमार शिंदे, किसन कल्याणकर, अनिरुद्ध कोल्हापुरे, मुकुंद भावे, संग्रामसिंह निकम, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे संजय शेटे, उपाध्यक्ष धनंजय दुग्गे, अजित कोठारी, राहुल नष्टे, संपत पाटील, प्रशांत शिंदे, जयेश ओसवाल, विश्वजित कोलते, जलतरणपटू रोहित हवालदार, राजेंद्र हवालदार, बाबा लिंग्रस, रमेश पोवार, आसमा संस्थेचे अध्यक्ष सुनील बासरानी, उपाध्यक्ष प्रशांत कुलकर्णी, खजानीस संजय चिपळूणकर, अमरदीप पाटील, अभय मिराशी, सुहास लुकतुके, सुनील बणगे, लालासो गायकवाड, चंद्रकांत चव्हाण, प्रा. डॉ. मधुकर पाटील, निसर्गमित्र संस्थेचे कार्यवाह अनिल चौगले, ‘पुढारी’कार पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव विद्यालयाचे मुख्याध्यापक गणेश बाटे, अ. भा. शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे माजी अध्यक्ष फत्तेसिंह सावंत, स्वाभिमानी संभाजी बि—गेडचे रुपेश पाटील, अभिजित कांजर, तुकाराम माळी तालीम मंडळाचे अध्यक्ष शिवाजी पवार, किरण अतिग्रे, शेखर चौगुले, परेश टिपुगडे, जे. बी. कुसाळे फाऊंडेशनचे रमेश कुसाळे, को. जि. स्केटिंग संघटनेचे सचिव डॉ. महेश कदम, भास्कर कदम, व्हाईट आर्मी अशोक रोकडे, साक्षी सपाटे, भारती ठोंबरे, सागरिका भोसले, विश्वजित पाटील, सुजल भोसले, सिद्धांत नागवेकर, रितेश यादव, विजयसिंह पाटील, भगवानगिरी महाराज नूल, प्रकाश तेलवेकर, लता तेलवेकर, पत्रकार गुरुबाळ माळी, निशिकांत तोडकर, संतोष पाटील, समीर देशपांडे, सुरेश आंबुसकर, राजेंद्र मकोटे, स्वामी विवेकांनद शिक्षण संस्थेचे सीईओ कौस्तुभ गावडे, कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर, शिवाजी विद्यापीठ प्राचार्य संघटनेचे अध्यक्ष डॉ. क्रांतिकुमार पाटील, प्रा. डॉ. सुजय पाटील, कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठचे एस. डी. लाड, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव आर. वाय. पाटील, प्रा. सी. एम. गायकवाड, महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे, राज्य सचिव शिवाजी भोसले, विभाग सचिव महादेव डावरे, खासगी शिक्षक पतसंस्था चेअरमन सूर्यकांत बरगे, व्हा. चेअरमन सर्जेराव नाईक, सचिव साताप्पा कासार, आकाश चव्हाण, शिवाजी विद्यापीठ सेवक संघाचे अध्यक्ष मिलिंद भोसले, उपाध्यक्ष संजय पोवार, सहसचिव डॉ. राजेंद्र खामकर, सदस्य अनिल गायकवाड, सतीश कुसुंबे, सचिन नाळे, चंद्रशेखर कदम, सुरेश पाटील, निवृत्त अभियंता रमेश पोवार, शिवाजी विद्यापीठ मास कम्युनिकेशन विभाग समन्वयक डॉ. शिवाजी जाधव, हिंदी अधिविभाग माजी प्रमुख डॉ. अर्जुन चव्हाण, चाटे शिक्षण समूहाचे विभागीय संचालक डॉ. भारत खराटे, वाय. डी. माने शिक्षण समूहाचे प्रमुख भैयासाहेब माने, सिनेट सदस्य प्रा. मधुकर पाटील, आनंदी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सतीश देसाई, सचिव डॉ. विद्या देसाई, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अभिजित राऊत, शहराध्यक्ष अजिंक्य शिंदे.
जिल्हा उपनिबंधक कार्यालयीन अधीक्षक उदय उलपे, अधिकारी दादाराव जाधव, बाजार समितीचे सचिव जयवंत पाटील, अधिकारी अमित पाटील, छत्रपती शिवाजी चौक तरुण मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार वळंजू, उपाध्यक्ष सुहास भेंडे, अॅड. प्रताप जाधव, रघुनाथ जगताप, दत्तात्रय लाड, दिलीप खोत, प्रफुल्ल भेंडे, नितीन पाटील, आरिफ खान, रशीद मुल्ला, भागेश लंगरकर, खाटीक समाजाचे ज्येष्ठ संचालक विजय कांबळे, शिवप्रसाद घोडके, भारत घोडके, सुनीलकुमार घोटणे, संचालिका सुनीता घोडके, शेतकरी संघ कर्मचारी संघटनेचे दीपक निंबाळकर, सयाजी घोरपडे, मिथुन जाधव, अथर्व सूर्यवंशी, विजय सूर्यवंशी, यश मोहिते, समीर मोहिते, जिल्हा माहिती अधिकारी वृषाली पाटील, नृत्य कलाकार शेफाली मेहता, सामाजिक कार्यकर्त्या हेमा भोसले, छाया व्हटकर, रिक्षा संघटना अध्यक्ष राजू जाधव, सुभाष शेटे, चंद्रकांत भोसले, क्लायमॅक्सचे उदय जोशी, उत्कर्ष भंडारे, सी. व्ही. पाटील, सुरेश साळोखे, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे संजय शेटे, क्रेडाईचे अध्यक्ष के. पी. खोत, सचिव संदीप मिरजकर, खजिनदार अजय डोईजड, माजी अध्यक्ष महेश यादव, बांधकाम व्यावसायिक संजय चव्हाण, यश चव्हाण, प्रदीप भारमल, संग्राम दळवी, वडणगेचे माजी सरपंच सचिन चौगुले, अॅपल हॉस्पिटलचे डॉ. अशोक भूपाळी, गीता आवटे, आर्किटेक्चर असोसिएशनचे अध्यक्ष अजय कोराणे, कोल्हापूर अर्बन बँकेचे शिरीष कणेरकर, सुभाष भांबुरे, जिल्हा बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अॅड. माणिकराव पाटील, सेक्रेटरी अॅड. राजू ओतारी, लोकल ऑडिटर अॅड. कर्णकुमार पाटील, अॅड. सोनाली शेठ, ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. महादेवराव आडगुळे, अॅड. धनंजय पठाडे, अॅड. शिवाजीराव राणे, अॅड. गिरीश खडके, अॅड. रणजित गावडे, अॅड. प्रशांत शिंदे, अॅड. संपतराव पवार, अॅड, अजितराव मोहिते, अॅड. गिरीश नाईक, अॅड. संजय दाभाडे, अॅड. विक्रम सावंत. लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या पोलिस उपअधीक्षक वैष्णवी पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक रवींद्र कळमकर, राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुशांत चव्हाण, शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे, जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजीव झाडे, पोलिस उपनिरीक्षक संतोष गोळवे, लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे उदय पाटील, प्रकाश भंडारी, लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक भगवान गिरी गोसावी, हवालदार संजय कोळी, मंगेश माने, धोंडिराम शिंदे, प्रकाश लोहार, गजानन परीट, तानाजी दावणे, नारायण पाटील, राहुल मोहिते, आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने, अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे, डॉ. संजय घोटणे, डॉ. अपराजित वालावलकर, डॉ. संदीप पाटील, जिल्हा परिषद विकास यंत्रणा प्रकल्प संचालक सुषमा देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, मुख्य लेखा, वित्त अधिकारी अतुल आकुर्डे, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रमोद बाबर, मुख्यमंत्री सडक योजना सहायक लेखाधिकारी प्रदीप सकटे, अॅड. श्रीकांत जाधव, माजी नगरसेवक अशोक भंडारे, सुनील श्रीश्रीमाळ, एस. पी. वेल्थचे अनिल पाटील, आर्च आयुर्वेदच्या रेखा सारडा, कोल्हापूर जिल्हा स्वाभिमानी वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष किरण व्हनगुत्ते, राज्य संघटनेचे उपाध्यक्ष रघुनाथ कांबळे, परशुराम सावंत, धनंजय शिराळकर, सुरेश ब—म्हपुरे, शशी जाधव, कोल्हापूर शहर महानगर विक्रेता संघटनेचे अध्यक्ष रवि लाड, संघटक शंकर चेचर, समीर कवठेकर, सुरेंद्र चौधरी, इंद्रजित पवार, सौरभ लाड, जितेंद्र लाड, सुजित लाड, रणजित आयरेकर, ऋतुराज चेचर, कृष्णराज चेचर, महालक्ष्मी वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष केदार पाटील, सुभाष औंधकर, श्रीकांत सावेकर, चंद्रकांत भोसले, संजय मोरे, आदित्य पाटील, श्रेयश पाटील, उत्तम कुकडे, राजारामपुरी डेपो वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे संघटक रमेश जाधव, उपाध्यक्ष संदीप ब—म्हदंडे, महेश घोडके, सौरभ लाड, नामदेव गडदे, प्रफुल्ल कोतमिरे, रविंद्र खोत, नजीर मदार आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती.
दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांना त्यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावरून भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या. सोमवारपासूनच फेसबुक, व्हॉटस्अॅप, इन्स्टाग्राम, एक्स यांसह सर्व समाज माध्यमांवर डॉ. जाधव यांच्या छायाचित्रांसह शुभेच्छा संदेश व व्हिडीओ झळकत होते. निर्भीड-नि:पक्ष दैनिकाचे कणखर संपादक, पुरोगामी विचारांचा वारसा जपणारे पत्रकार, सामाजिक चळवळीचे बुलंद नेतृत्व, राजकीय क्षेत्राचे मार्गदर्शक यासह विविध क्षेत्रांत दै. ‘पुढारी’च्या माध्यमातून सुरू असणारे लोकोपयोगी कार्य याबद्दलच्या पोस्टस् व्हायरल झाल्या होत्या.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, तेजस ठाकरे यांनी डॉ. जाधव यांच्या निवासस्थानी सकाळी येऊन त्यांचे अभीष्टचिंतन केले. त्यांना शाल परिधान करत शुभेच्छा दिल्या. यावेळी ठाकरे यांनी विविध विषयांवर डॉ. जाधव यांच्याशी चर्चा केली. ठाकरे यांनी डॉ. जाधव यांच्या ठाकरे घराण्याशी असलेल्या ऋणानुबंधाच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी खासदार शाहू महाराज, काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील, आमदार मिलिंद नार्वेकर, शाहू ग्रुपचे समरजित घाटगे आदी उपस्थित होते.
सर्वसामान्यांच्या हितासाठी कणखर आणि रोखठोक, नि:पक्षपाती भूमिका घेत, त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यास अग्रणी राहणार्या डॉ. जाधव यांच्या सामाजिक आणि सार्वजनिक जडणघडणीतील अनेक आठवणींना यानिमित्त मान्यवरांनी उजाळा देत, डॉ. जाधव म्हणजे सर्वसामान्यांचा आधारवड असल्याच्या भावना व्यक्त केल्या. जगातील सर्वोच्च रणभूमीवर सैनिकांसाठी उभारलेले सियाचीन हॉस्पिटल असो अथवा वाळवंटात भूजसारख्या ठिकाणी उभारलेले सुसज्ज हॉस्पिटल असो, नैसर्गिक आपत्तींत नागरिकांच्या सहकार्याने निधी उभारून आपत्तीग्रस्तांना दिलेला दिलासा असो, सीमा प्रश्न, ऊस दराचा प्रश्न, कोल्हापूरचा टोल, खंडपीठ आदींसाठी डॉ. जाधव यांनी दिलेल्या योगदानाची आठवण अनेकांनी सांगितली.