कोल्हापूर : दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव आम्हा वकिलांसाठी गॉड फादरच आहेत आणि ते यापुढेही राहणार आहेत, असे सांगत कोल्हापुरात सर्किट बेंच व्हावे, हा प्रश्न त्यांनी लावून धरला. यामुळे सर्किट बेंचचे श्रेय दै. ‘पुढारी’चे असल्याच्या भावना वकिलांनी व्यक्त केल्या.
सर्किट बेंच मंजूर झाल्याबद्दल ज्येष्ठ वकील अॅड. माणिकराव मुळीक यांच्या हस्ते डॉ. जाधव यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी वकिलांनी आपल्या भावना व्यक्त करताना या लढ्यातील ‘पुढारी’च्या योगदानाची माहिती दिली. यावेळी अॅड. अभिजित भोसले, अॅड. अमित बाडकर, अॅड. दीपक पाटील, अॅड. इंद्रजित चव्हाण, अॅड. तेजगौंड पाटील, अॅड. सतीश कुणकेकर, स्टेट इंगलॉयर असोसिएशन अध्यक्ष अॅड. चेतन शिंदे, अॅड. बी. एस. पाटील, अॅड. मीना पवार, अॅड. कल्पना माने, अॅड. सविता परब, अॅड. रणजित कवाळे, अॅड. यश गुजर, अॅड. चेतना इंजिनिअर आदी उपस्थित होते.