अजित पवार यांच्या अकाली एक्झिटने मन सुन्न : डॉ. प्रतापसिंह जाधव

Ajit Pawar
उपमुख्यमंत्री अजित पवार File Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची अकाली एक्झिट धक्का देणारी आहे. विश्वास न बसणारी ही बातमी ऐकल्यानंतर मन सुन्न झाले, अशा शोक भावना दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी व्यक्त केल्या. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कार्यशैलीमुळे त्यांनी ‘दादा’ हे नाव मिळविले, अशा शब्दांत त्यांनी अजितदादा यांना श्रद्धांजली वाहिली.

डॉ. जाधव म्हणाले, खरे तर याअगोदर माझे मित्र विलासराव देशमुख, पतंगराव कदम, गोपीनाथ मुंडे, आर. आर. पाटील यांच्या निधनाने महाराष्ट्राची हानी झालीच आहे. परंतु, अजितदादांची एक्झिट फार लवकर झाली. या अपघाताचा हवाई वाहतूक प्राधिकरणाने अभ्यास केला पाहिजे.

पवार कुटुंबीयांचे आणि माझे संबंध जुने आहेत. 1966-67 मध्ये जेव्हा मी पुण्यात शिक्षणासाठी होतो, तेव्हा ज्येष्ठ नेते शरद पवार युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते. तेव्हापासून माझा व त्यांच्या कुटुंबाचा परिचय आहे, असे सांगत डॉ. जाधव म्हणाले, अजितदादा 1991 मध्ये लोकसभा निवडणूक लढवून राजकारणात आले. तेव्हापासून त्यांचा आणि माझा संबंध आला. अजितदादा यांची कामाची पद्धत, भाषाशैली आणि स्वभाव स्पष्ट होता. काम होणार असेल तर ते स्पष्ट सांगत. इतर नेत्यांसारखे बघू, करू, असे त्यांनी कधीच सांगितले नाही. ते वक्तशीर होतेच; पण त्यांनी प्रशासनावरही घट्ट पकड ठेवली होती. निर्णय घेण्याची धमक त्यांच्यात होती.

अजितदादांची भावलेली गोष्ट म्हणजे, मोठ्या वृक्षाच्या सावलीत छोटे झाड मोठे होऊ शकत नाही; पण शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याच्या छायेत राहूनदेखील त्यांनी आपल्या स्वतंत्र कार्यशैलीने स्वतंत्र नेतृत्व निर्माण केले होते, असे सांगत डॉ. जाधव म्हणाले, त्यांच्या प्रदीर्घ राजकीय जीवनात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कार्यशैलीमुळे त्यांनी ‘दादा’ हे नाव मिळविले. महाराष्ट्रात दादा या नावानेच ते ओळखू लागले. माझ्या सहस्रचंद्र दर्शन सोहळ्यासाठी ते आले होते. त्यांनी माझा भरभरून गौरव केला. तो कोल्हापुरातील त्यांचा शेवटचा जाहीर सार्वजनिक कार्यक्रम होता. डॉ. योगेश जाधव यांच्याबरोबर मंगळवारीच (दि. 27) त्यांनी दिलखुलास गप्पा केल्या. यामुळे कल्पनाही करवत नाही की, दादा एवढ्या लवकर जातील. पवार कुटुंबाचे नाते कोल्हापूरशी वेगळे आहे. शरद पवार यांच्या आई कोल्हापूरच्या आहेत, असे सांगत ‘पुढारी’ परिवार व जाधव कुटुंबीय त्यांच्या दुःखात सहभागी आहे, असे सांगत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news