Doctors Day Event | ख्यातनाम बालरोग, जीवनशैली तज्ज्ञ डॉ. हेमंत जोशी यांचे उद्या व्याख्यान

दै. ‘पुढारी’ व डी. वाय. पाटील हॉस्पिटलतर्फे ‘डॉक्टर्स डे’निमित्त आयोजन
Doctors Day Event |
Doctors Day Event | ख्यातनाम बालरोग, जीवनशैली तज्ज्ञ डॉ. हेमंत जोशी यांचे उद्या व्याख्यान
Published on
Updated on

कोल्हापूर : दै. ‘पुढारी’ आणि ‘डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘डॉक्टर्स डे व्याख्यानमाला’ यावर्षी २३ व्या वर्षात पदार्पण करत आहे. आरोग्यविषयक प्रबोधनाचे एक प्रभावी व्यासपीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या उपक्रमात यंदाचे वक्ते म्हणून ख्यातनाम बालरोग व जीवनशैली तज्ज्ञ डॉ. हेमंत जोशी ‘दीर्घ आरोग्याची गुरुकिल्ली’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

बुधवारी (दि. १) सायंकाळी शाहू स्मारक भवन, दसरा चौक येथे हा कार्यक्रम होणार आहे. नूतनीकरण झालेल्या वातानुकूलित सभागृहात होणारा शाहू जयंतीच्या कार्यक्रमानंतरचा पहिलाच सार्वजनिक कार्यक्रम असल्याने कोल्हापूरकरांना या व्याख्यानाची उत्सुकता आहे. डॉ. हेमंत जोशी दीर्घ अनुभवी बालरोगतज्ज्ञ असून, आहार व जीवनशैली विशेषज्ञ म्हणून त्यांची जगभरात ख्याती आहे. जीवनशैली विषयात त्यांचा अभ्यास असून परखड मते ते मांडतात. जी त्यांनी स्वतःच्या जीवनातही अंगीकारली आहेत. त्यांच्या या अनुभवसिद्ध ज्ञानामुळे जगभरातील लाखो लोकांच्या जीवनात परिवर्तन झाले आहे.

एकंदरीतच धकाधकीचे आणि धावपळीचे जीवन, वाढता ताणतणाव, व्यायामाचा अभाव, वाढती व्यसनाधिनता तसेच बदललेली जीवनशैली, पाश्चात्त्य संस्कृतीचे अनुकरण यामुळे मनोविकार, रक्तदाब, मधुमेह, स्थुलता, अपचन, निद्रानाश, कॅन्सर, हृदयविकार यासारखे आजार वाढत आहेत. आजार झाल्यावर उपचारासाठी नवनवीन ज्ञान, तंत्रज्ञान विकसित होत आहे, असे असताना आजार होऊच नयेत म्हणून जीवनशैलीत कोणते बदल करावेत, तसेच आजार झाल्यानंतर कमीत कमी औषधोपचारासह आपले आरोग्य कसे अबाधित ठेवावे, मुले सदृढ, सक्षम आणि पराक्रमी कशी बनतील, याविषयी ते मार्गदर्शन करणार आहेत. आरोग्यासाठी जागरूक नागरिक, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ, पालक व शिक्षक यांनी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

डॉ. हेमंत जोशी समाजहितासाठी समर्पित व्यक्तिमत्त्व

डॉ. जोशी हे विरार (पालघर) येथे गेली ४० वर्षे निष्ठेने कार्यरत आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे २० ऑक्टोबर १९५४ रोजी जन्मलेल्या डॉ. जोशी यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून आपले शिक्षण पूर्ण केले. नगरपालिकेच्या शाळेत प्राथमिक आणि भोसला मिलिटरी स्कूल (नाशिक) येथून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी मुंबईच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस आणि बालरोगशास्त्रातील एम.डी. ही पदवी संपादन केली. गेल्या चार दशकांत त्यांनी दोन लाखांहून अधिक बालकांवर उपचार केले. केवळ रुग्णसेवाच नव्हे, तर ‘सामाजिक बालरोगतज्ज्ञ’ म्हणून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘१५० न्यू आयडियाज टू इम्प्रूव्ह ग्लोबल चाईल्ड सर्व्हायव्हल’ यांसारख्या जागतिक दर्जाच्या हँडबुक्सचे ते सहलेखक आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news