kolhapur | डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासन सर्व सोयीसुविधांनी परिपूर्ण व्हावे

प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी; ‘पुढारी’ भवनमध्ये अध्यासन कामासंदर्भात बैठक
कोल्हापूर : पुढारी भवनमध्ये आयोजित डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासन कामकाज आढावा बैठकप्रसंगी दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव, प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव. समवेत डॉ. व्ही. एन. शिंदे, अनिल पाटील, सतीश पडळकर, रणजित यादव, डॉ. शिवाजी जाधव, चंद्रकांत जितकर, सुनील नागराळे आदी.
कोल्हापूर : पुढारी भवनमध्ये आयोजित डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासन कामकाज आढावा बैठकप्रसंगी दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव, प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव. समवेत डॉ. व्ही. एन. शिंदे, अनिल पाटील, सतीश पडळकर, रणजित यादव, डॉ. शिवाजी जाधव, चंद्रकांत जितकर, सुनील नागराळे आदी. (छाया : पप्पू अत्तार)
Published on
Updated on

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासन पूर्णपणे मीडियाला वाहिलेले आहे. अध्यासनात येणार्‍या काळात नवीन कोर्सेससह नावीन्यपूर्ण गोष्टी सुरू होणार आहेत, त्या अनुषंगाने अध्यासनाची इमारत सर्व सोयी-सुविधांनी परिपूर्ण व पर्यावरणपूरक करावी, अशी सूचना प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी केली.

पुढारी भवनमध्ये शनिवारी सायंकाळी डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनाच्या कामाबाबत दै.‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या प्रमुख उपस्थित झाली. अध्यासनाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी दोन वर्षांत झालेल्या विविध विकास कामांची माहिती दिली. यावेळी कुलगुरू डॉ. गोसावी यांनी ऑडोटोरियममध्ये इतर सुविधांबरोबरच यूपीएस व जनरेटची सुविधा करण्यात यावी. इमारतीला फेन्सिंग करून घ्यावे. परिसरात विविध ठिकाणी सीसीटीव्ही लावून घ्यावेत, अशा सूचना केल्या.

डॉ. जाधव यांनी मे महिन्यात उद्घाटन करण्याच्या अनुषंगाने उर्वरित कामांधील सिमेंट रस्ता, पार्किंग सुविधा, पेंट्री व कॅफेट एरिया करावा, अशा सूचना दिल्या. तसेच अध्यासनामध्ये विद्यार्थ्यांसाठी उपयोगी असे राष्ट्रीय स्तरावरील नवीन कोर्सेस सुरू करण्यास सांगितले. प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांनी अध्यासनामध्ये ग्राफिक डिझाईन, व्हिडीओ एडिटिंग, इव्हेंट मॅनेजमेंटसारखे नवीन कोर्सेस सुरू करण्याची सूचना केली. यावेळी दै. ‘पुढारी’चे समूह सरव्यवस्थापक अनिल पाटील, कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, आकाशवाणीचे निवृत्त अधिकारी सतीश पडळकर, उपकुलसचिव रणजित यादव, निवृत्त उद्यान अधीक्षक चंद्रकांत जितकर, कंत्राटदार सुनील नागराळे आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news