सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवूनच डॉ. डी. वाय. पाटील यांचे आयुष्यभर कार्य : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कोल्हापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉ. डी. वाय. पाटील यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्यासोबत इतर नेते.
कोल्हापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉ. डी. वाय. पाटील यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्यासोबत इतर नेते.
Published on
Updated on

कोल्हापूर : सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी आयुष्यभर कार्य केले. त्यांच्या संस्थेमुळे माझा मुलगा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे डॉक्टर झाला, तर मला त्यांच्या विद्यापीठाने डॉक्टरेट प्रदान करून सन्मानित केले. या दोन्ही घटना मी आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ तथा माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली.

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी बुधवारी दुपारी कसबा बावडा येथील ‘यशवंत निवास’ येथे डॉ. डी. वाय. पाटील यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. डॉ. डी. वाय. पाटील यांनी शिक्षण, वैद्यकीय सेवा, सहकार आणि क्रीडा क्षेत्रात दिलेले योगदान देशासाठी दिशादर्शक ठरले आहे. त्यांच्या निधनामुळे या सर्व क्षेत्रांतील अजातशत्रू आणि दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वाची उणीव कायमची जाणवेल, असे शिंदे म्हणाले. त्यांच्या अंतिम दर्शनासाठी जमलेला जनसागर हा त्यांच्या कार्याचा आणि जनमानसातील स्थानाचा पुरावा असल्याचेही त्यांनी नमूद केले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि डॉ. डी. वाय. पाटील यांच्यात अत्यंत जिव्हाळ्याचे कौटुंबिक संबंध होते, अशी आठवण सांगताना शिंदे म्हणाले, मुंबईत मेडिकल कॉलेज सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या रुग्णालयाच्या मंजुरीचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी बाळासाहेबांनी हे कॉलेज आपल्या कुटुंबातीलच असल्याची भावना ठेवून मंजुरी दिली होती. डॉ. डी. वाय. पाटील यांच्या जाण्याने कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news