Kolhapur abortion case : डॉ. चंद्रकांत गायकवाडवर सापळा रचून कारवाई

गर्भपाताची प्रक्रिया सुरू असतानाच पोलिस पोहोचले
Kolhapur abortion case
Kolhapur Crime News
Published on
Updated on

कोल्‍हापूर : माजी सिव्‍हिल सर्जन असलेला डॉ. चंद्रकांत गायकवाड अवैध गर्भलिंग निदान करत असल्‍याच्‍या माहितीवरून पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्यासह पथकाने बुधवारी रात्री कदमवाडी येथील प्रतिमा हॉस्‍पिटल येथे सापळा रचून त्‍याला अटक केली.

बुधवारी बनावट महिला ग्राहक पाठवून गर्भलिंग निदान करायचे असून, मुलगी असल्यास तत्काळ गर्भपात करायचा असल्याचे संबंधित महिलेने सांगितले. यानुसार डॉ. गायकवाड याने तपासणी करून मुलगी असल्याने गर्भपाताची प्रक्रिया सुरू केली. याच दरम्यान पोलिसांनी छापा टाकून गायकवाडला ताब्यात घेतले.

मशिन, गर्भपाताची औषधे जप्त

डॉ. गायकवाड याच्या प्रतिमा हॉस्‍पिटलमधून पोलिसांनी गर्भपात करण्याच्या गोळ्या, सोनोग्राफी मशिन, वैद्यकीय उपकरणे जप्त केली. गर्भपाताच्या १०० हून अधिक गोळ्यांचा यामध्ये समावेश आहे. डॉ. गायकवाडने गांधीनगर, सोळांकूर, हातकणंगले येथे वैद्यकीय अधीक्षक म्हणून तर बढती नंतर पोलादपूर, मुंबई, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, बीड येथे जिल्हा शल्यचिकीत्सक म्हणून काम पाहिले. पुणे येथील सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये अतिरिक्त अधीक्षक, सहायक संचालक म्हणून सेवा बजावली आहे. मुंबई येथील जी. टी. हॉस्पिटलमध्ये निवासी वैद्यकीय अधिकारी पदावर असताना भ्रष्टाचाराच्या आरोपात निलंबित केले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news