कोल्हापूर : कोल्हापूर विभागातील 92 हून अधिक महाविद्यालयातील 1381 तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना (सीएचबी) दिवाळीपूर्वीच 7 कोटी 14 लाख 36 हजार रुपये मानधन मिळणार असल्याने त्यांची दिवाळी गोड होणार आहे.
शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांचा समावेश आहे. बहुसंख्य महाविद्यालयातील पदे रिक्त आहेत. महाविद्यालयात विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणूनसीएचबी प्राध्यापकांची भरती केली आहे. या प्राध्यापकांची मानधन बिले सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार महाविद्यालयांनी प्रस्ताव पाठविले आहेत. कोषागार कार्यालयाने सुमारे 7 कोटी रुपये मंजूर करून महाविद्यालयांना पाठविले आहेत.