kolhapur | जिल्हा शल्यचिकिस्तक डॉ. वाडीकर, डॉ. देशमुख यांच्यासह तिघे निलंबित

medical officers suspended
kolhapur | जिल्हा शल्यचिकिस्तक डॉ. वाडीकर, डॉ. देशमुख यांच्यासह तिघे निलंबित(File Photo)
Published on
Updated on

कोल्हापूर : जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर, तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख आणि आरोग्य उपसंचालक कार्यालयातील मुख्य प्रशासकीय अधिकारी नामदेव मोरे यांना शुक्रवारी निलंबित करण्यात आले.

वैद्यकीय बिलातील अनियमितता, कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. वैद्यकीय बिलासह अनेक प्रकारात आर्थिक व्यवहार झाल्याची डायरी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या कार्यालयात सापडल्याने खळबळ उडाली होती. याप्रकरणी प्रारंभी डॉ. देशमुख यांची जिल्हा शल्यचिकित्सक पदावरून वैद्यकीय अधीक्षक पदावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात बदली करण्यात आली होती. त्यांच्या जागी नियुक्त केलेल्या डॉ.वाडीकर यांनीही कर्तव्यात कसूर केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news