

कोल्हापूर : क्रीडा क्षेत्रात उल्लेखणीय कामगिरी करणाऱ्या खेळाडू व मार्गदर्शकांच्या २०२१-२२ व २०२२-२३ या वर्षांच्या जिल्हा क्रीडा पुरस्कारांची घोषणा शुक्रवारी झाली. ७ खेळाडू व २ मार्गदर्शक अशा एकूण ९ जणांना स्वातंत्र्यदिनी शनिवारी (दि. १५) सकाळी ९ वाजता, जिल्हाधिकारी कार्यालयात होणाऱ्या ध्वजारोहण समारंभात पुरस्कार दिले जाणार आहेत. पुरस्कारार्थींच्या कामगिरीत राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांतील उल्लेखनीय यशाचा समावेश असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी दिली.
सन २०२१-२२ चे पुरस्कार : मार्गदर्शक म्हणून सागर जाधव (हॉकी) खेळाडू म्हणून प्रथमकुमार शिंदे (तलवारबाजी), शुभांगी पाटील (पॉवरलिफ्टिंग), तर थेट पुरस्कारासाठी जान्हवी सावर्डेकर (पॉवरलिफ्टिंग), दिव्यांग गटात अन्नपूर्णा कांबळे (पॅरा जलतरण).
सन २०२२-२३ चे पुरस्कार : मार्गदर्शक म्हणून संदीप पाटील (हँडबॉल व फुटबॉल प्रशिक्षक) खेळाडू म्हणून पृथ्वीराज पाटील (रग्बी), श्लोका शिंदे (तलवारबाजी) , दिव्यांग गटात दीपक पाटील (पॅरा जलतरण).