kolhapur | जिल्ह्यात आज रात्री दहापासून जमावबंदी

मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा: जिल्हाधिकारी येडगे यांचे आवाहन
Kolhapur Zilla Parishad election
kolhapur | जिल्ह्यात आज रात्री दहापासून जमावबंदी
Published on
Updated on

कोल्हापूर : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवारी (दि. 7) मतदान होणार आहे. याकरीता जाहीर प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर गुरूवारी (दि. 5) रात्री 10 वाजल्यानंतर जिल्ह्यात जमावबंदी लागू केली आहे. दरम्यान मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.

जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदारसंघ कार्यक्षेत्रात 5 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजल्यापासून ते मतदानाच्या दिवशी 7 फेब्रुवारी रोजी मतदान संपेपर्यंत बेकायदेशीर जमाव जमवणे, सार्वजनिक सभा, बैठका घेणे तसेच पाच किंवा पाचपेक्षा अधिक लोक एकत्र येणे अशी कृत्ये करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

या ठिकाणी होणार मतमोजणी

करवीर- शासकीय धान्य गोदाम, रमणमळा, कसबा बावडा, गगनबावडा- तहसिलदार कार्यालय, शाहुवाडी- जुने शासकीय धान्य गोदाम, तहसिल कार्यालय, पन्हाळा- नगरपरिषद, मयूर बाग हॉल, कागल- जवाहर नवोदय विद्यालय, राधानगरी- तालुका क्रिडा संकुल, राजर्षी शाहू विद्यामंदीर जवळ, आजरा- तहसिलदार कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत हॉल, भुदरगड- तालुका क्रिडा संकुल, मौनी विद्यापीठ परिसर, गारगोटी, शिरोळ- तहसिल कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, हातकणंगले- राजीव गांधी सांस्कृतिक भवन, कापड मार्केट समोर, इचलकरंजी, गडहिंग्लज- पॅव्हेलियन हॉल, गांधीनगर, गडहिंग्लज, चंदगड- मिटींग हॉल (ऑडिटोरियम) तहसिल कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत.

मतमोजणी केंद्र परिसरात कलम 163 लागू

मतमोजणी ठिकाणाच्या परिसरात दि. 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वाजल्यापासून ते मतमोजणी संपेपर्यंत कलम 163 लागू करण्यात आले आहे. त्यानूसार मतमोजणी ठिकाणापासून 200 मीटर सभोवतालच्या परीसरात मतमोजणी कर्मचारी पुरवठादार, उमेदवार व त्यांचे नियुक्त केलेल्या प्रतिनिधी व्यतिरिक्त कोणाही व्यक्तीला प्रवेश करता येणार नाही. मतमोजणी कालावधीत अथवा मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या लाऊड स्पिकरचा वापर सक्षम पोलीस अधिकार्‍यांच्या लेखी पूर्वपरवानगी शिवाय रस्त्यावर, व्यासपीठावर किंवा फिरत्या वाहनावर बसवून करता येणार नाही. 200 मीटर परिसरामध्ये मोटरगाड्या, वाहनांचा वापर करणे तसेच मोबाईल फोन, कॉर्डलेस फोन, वायरलेस सेट किंवा तत्सम इलेक्ट्रॉनिक सहित्य बाळगणे, वापरणे तसेच कोणत्याही प्रकारची शस्त्रे, अग्नी शस्त्रे व दारुगोळा आदी जवळ बाळगणे, वाहतुक, करण्यास मनाई करण्यात आली आहे.

मतमोजणी दिवशी मिरवणूक, रॅली, डीजे, फटाके व गुलालावर बंदी

जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीची मतमोजणी सोमवारी (दि. 9) होणार आहे. मतमोजणीनंतर विजयी उमेदवारांची मिरवणूक काढणे, विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी अथवा कोणत्याही व्यक्ती, राजकीय पक्ष, संस्थांनी गावातून किंवा शहरातून मिरवणूक, रॅली काढणे, डीजे किंवा साऊंड सिस्टीम लावणे, मोटारसायकलचे सायलेन्सर काढून वाहन चालविणे, सार्वजनिक ठिकाणी गुलाल उधळणे अथवा त्याचा वापर करणे तसेच फटाके लावणे, फोडणे याला बंदी घालण्यात आली आहे.

जिल्ह्यातील 2 हजार 691 मतदान केंद्रांवर मतदान

जिल्ह्यातील 2 हजार 691 केंद्रांवर शनिवारी मतदान होणार आहे. सकाळी 7.30 ते संध्याकाळी 5.30 या कालावधीत होणार्‍या मतदानाचा हक्क सर्व मतदारांनी बजावावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

जिल्ह्यातील काही शाळांना शुक्रवार, शनिवार सुट्टी

जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमुळे काही शाळांना शुक्रवारी आणि शनिवारी सुट्टी देण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी अनेक शाळांतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांची नियुक्ती केली आहे. शुक्रवारी सकाळी 9 पासून निवडणूक साहित्य वाटप केले जाणार आहे. साहित्य घेऊन मतदान पथके मतदान केंद्रावर सकाळी 11.30 पासून पोहोचण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे ज्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची निवडणूक कामासाठी नियुक्ती केली आहे, त्या शाळांना शुक्रवारी सुट्टी जाहीर केली आहे. ज्या शाळेतील (प्राथमिक व माध्यमिक) सर्व शिक्षकांची नियुक्ती झालेली नाही, त्या शाळा शुक्रवारी सकाळी 7.30 ते 11.30 या वेळेत भरविण्याचे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news