कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात झालेल्या मतदानाची अंतिम आकडेवारी गुरुवारी जाहीर करण्यात आली. जिल्ह्यात 76.63 टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली. जिल्ह्यातील एक मतदारसंघ वगळता उर्वरित मतदारसंघांत मतदानाचा टक्का यावेळी वाढला. जिल्ह्यातील विधानसभेच्या दहा मतदारसंघांत एकूण 33 लाख 5 हजार 98 मतदारांपैकी 25 लाख 32 हजार 657 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण 16,69,270 पुरुष मतदारांपैकी 12,97,561 जणांनी, 16,35,642 महिला मतदारांपैकी 12,35,010 महिलांनी व 186 पैकी 86 इतर मतदारांनी मतदान केले. मतदान करणार्या पुरुषांची टक्केवारी 77.73, महिलांची टक्केवारी 75.51, तर इतरांची टक्केवारी 46.24 इतकी राहिली. चंदगड मतदारसंघात पुरुष मतदारांचे प्रमाण 74.49 टक्के, तर त्या तुलनेत 75.47 टक्के महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
चंदगड : पुरुष 163470, महिला 164201 व इतर 9 अशा एकूण 327680 मतदारांपैकी पुरुष 121774 (74.49 टक्के), महिला 123918 (75.47 टक्के) व इतर 3 (33.33 टक्के), अशा एकूण 245695 (74.98 टक्के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
राधानगरी : पुरुष 177302, महिला 167108 व इतर 12 अशा एकूण 344422 मतदारांपैकी पुरुष 140315 (79.14 टक्के) महिला 129365 (77.41 टक्के) व इतर 9 (75 टक्के) अशा एकूण 269689 (78.30 टक्के ) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
कागल : पुरुष 171356, महिला 172311 व इतर 5 अशा एकूण 343672 मतदार. यापैकी पुरुष 143169 (83.55 टक्के), महिला 140395 (81.48 टक्के) व इतर 4 (80 टक्के) अशा एकूण 283568 (82.51 टक्के) मतदारांनी हक्क बजावला.
कोल्हापूर दक्षिण : पुरुष - 187400, महिला 185233 व इतर 51 अशा एकूण 372684 मतदारांपैकी पुरुष 142707 (76.15टक्के), महिला 139007 (75.04 टक्के) व इतर 29 (56.86 टक्के) अशा एकूण 281743 (75.60 टक्के) मतदारांनी हक्क बजावला.
करवीर : पुरुष 168193 महिला 156968 अशा एकूण 325161 मतदार. यापैकी पुरुष 144902(86.15 टक्के), महिला 131343 (83.68 टक्के) अशा एकूण 276245 (84.96 टक्के) मतदारांनी हक्क बजावला.
कोल्हापूर उत्तर : पुरुष 148809, महिला 152916 व इतर 18 अशा एकूण 301743 मतदारांपैकी पुरुष 100597 (67.60 टक्के), महिला 97059 (63.47 टक्के) व इतर 10 (55.56 टक्के) अशा एकूण 197666 (65.51 टक्के) मतदारांनी हक्क बजावला.
शाहूवाडी : पुरुष 157316, महिला 148923 व इतर 7 अशा एकूण 306246 मतदारांपैकी पुरुष 125620 (79.85 टक्के) महिला 116363 (78.14 टक्के) व इतर 4 (57.14 टक्के) अशा एकूण 241987 (79.02 टक्के) मतदारांनी हक्क बजावला.
हातकणंगले : पुरुष 173449, महिला 168216 व इतर 20 अशा एकूण 341685 मतदारांपैकी पुरुष 136055 (78.44 टक्के) महिला 125145 (74.40 टक्के) व इतर 15 (75 टक्के) अशा एकूण 261215 (76.45 टक्के) मतदारांनी हक्क बजावला.
इचलकरंजी : पुरुष 158721, महिला 153881 व इतर 62 अशा एकूण 312664 मतदारांपैकी पुरुष 111916 (70.51 टक्के) महिला 105927 (68.84 टक्के) व इतर 10 (16.13 टक्के) अशा एकूण 217853 (69.68 टक्के) मतदारांनी हक्क बजावला.
शिरोळ : पुरुष 163254, महिला 165885 व इतर 2 अशा एकूण 329141 मतदारांपैकी पुरुष 130506 (79.94 टक्के) महिला 126488 (76.25 टक्के) व इतर 2 (100 टक्के) अशा एकूण 256996 (78.08 टक्के) मतदारांनी हक्क बजावला.