श्राद्धाचा खर्च टाळत शालेय मुलामुलींना दिल्या सायकली

नागांव येथील पाटील कुटुंबीयांचा अनोखा उपक्रम
श्राद्धाचा खर्च टाळत शालेय मुलामुलींना दिल्या सायकली
श्राद्धाचा खर्च टाळत शालेय मुलामुलींना दिल्या सायकली
Published on
Updated on

शिरोली एमआयडीसी : नागाव (ता. हातकणंगले) येथील सुभाष पाटील यांनी त्यांच्या पत्नी सुवर्णा पाटील यांच्या पहिल्या श्राद्धाचा खर्च टाळत सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम राबविला आहे. नागाव फाटा येथुन रोज नागाव गावात शाळेला जाणाऱ्या १८ मुलामुलींना मोफत सायकली वाटप केले. सायकल वाटप आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांच्या हस्ते झाले.

नागाव फाटा ते नागाव गाव असे २ किलो मीटर अंतर पायपीट करत शाळेला जाणाऱ्या नागाव हायस्कूल नागांव व ज्ञानगंगा विद्यालय येथील विद्यार्थीनींना या उपक्रमाचा लाभ मिळाला. या आगळ्यावेगळ्या पद्धतीने श्रध्दांजली अर्पण करण्याच्या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे. यावेळी अरविंद अशोकराव माने, वारणा सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुभाष पाटील, उपसरपंच सुधीर पाटील, प्रताप पाटील, सुनिल पाटील, दिपक पाटील, प्रतिक पाटील, पुष्कराज पाटील, ओम पाटील यांच्यासह सर्व पाटील कुटुंबीय, नागांव सेवा सोसायटीचे सर्व संचालक, सर्व ग्रामपंचायत सदस्य, नागांव हायस्कूलचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news