Ambabai temple donation | अंबाबाईच्या चरणी भाविकांकडून एक कोटी 40 लाख रुपये अर्पण

महिनाभरातील 12 दानपेट्यांतील देणगी मूल्याची मोजदाद पूर्ण
Ambabai temple donation
कोल्हापूर : अंबाबाई मंदिरातील दानपेट्यांमध्ये अर्पण करण्यात आलेल्या देणगी मूल्याची मोजदाद करताना कर्मचारी. (छाया ः नाज ट्रेनर)
Published on
Updated on

कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या चरणी भाविकांनी गेल्या एक महिन्यात 1 कोटी 40 लाख 61 हजार 865 रुपये देणगी स्वरूपात अर्पण केले. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापनाच्या वतीने 12 दानपेट्यांतील देणगी मूल्याची मोजदाद शुक्रवारी (दि. 27) सायंकाळी पूर्ण झाली. गेल्या चार दिवसांपासून मंदिरातील अभिषेक मंडपात ही मोजदाद प्रक्रिया सुरू होती.

देवस्थान व्यवस्थापनाच्या वतीने मंदिरात 12 दानपेट्या ठेवण्यात आल्या आहेत. अंबाबाईच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांकडून या पेट्यांमध्ये रोख रक्कम देणगी मूल्य म्हणून अर्पण केले जाते. दर दोन किंवा तीन महिन्यांनी या देणगी मूल्याची मोजदाद केली जाते. सध्या मार्चअखेरीमुळे गेल्या एक महिन्यातील देणगी रक्कम मोजण्यात आली. पोलिस बंदोबस्तात 30 कर्मचार्‍यांच्याकरवी ही मोजदाद करण्यात आली.

पेटीनुसार देणगी मूल्याची मोजदाद

पेटी क्रमांक 1 : 27 लाख 14 हजार 256

पेटी क्रमांक 2 : 33 लाख 10 हजार 941

पेटी क्रमांक 3 : 1 लाख 62 हजार 767

पेटी क्रमांक 4 : 1 लाख 12 हजार 717

पेटी क्रमांक 5 : 2 लाख 17 हजार 757

पेटी क्रमांक 6 : 2 लाख 8 हजार 782

पेटी क्रमांक 7 : 28 लाख 60 हजार 425

पेटी क्रमांक 8 : 2 लाख 23 हजार 905

पेटी क्रमांक 9 : 1 लाख 9 हजार 144

पेटी क्रमांक 10 : 1 लाख 24 हजार 354

पेटी क्रमांक 11 : 33 लाख 903

पेटी क्रमांक 12 : 7 लाख 15 हजार 914

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news