

कोल्हापूर : ताराबाई पार्क, सर्किट हाऊस परिसरातील देवेंद्रराजे शिबीराजे खर्डेकर - सरलष्कर बहाद्दर (वय 44) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, कन्या, चिरंजीव, भाऊ प्रद्युम्नराजे असा परिवार आहे.
करवीर छत्रपतींच्या राज्यातील ख्यातनाम जहागीरदार कै. श्रीमंत शिबीराजे खर्डेकर (सरलष्कर बहाद्दर) यांचे ते द्वितीय सुपुत्र होत. शिवेंद्रराजे भोसले (सातारा) यांचे ते सख्खे आतेभाऊ होते. मनमिळावू स्वभावाचे असणारे देवेंद्रराजे दानोळी येथील शेती सांभाळत होते. त्यांच्यावर पंचगंगा नदीघाट परिसरातील पेरूची बाग येथे रविवारी अंत्यसंस्कार झाले.
यावेळी संभाजीराजे, मालोजीराजे, शिवेंद्रराजे व विक्रमराजे भोसले (सातारा), बाळ पाटणकर, दिलीपसिंह चव्हाण (हिम्मतबहाद्दर), समरजितसिंह घाटगे, प्रवीणसिंह घाटगे, दीप्तीमानराजे खर्डेकर, शिवरूपराजे खर्डेकर, ऋतुराज इंगळे, कर्नल दिलीप मंडलिक, कर्नल अमरसिंह सावंत, मानसिंग गायकवाड यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.