Dr. Akshata Gawade Research | ‘स्मार्ट कॉम्पॅक्ट अपर-लिम्ब फिजिओथेरपी डिव्हाईस’च्या डिझाईनला मान्यता

डॉ. अक्षता गावडे यांचे संशोधन; आरोग्यसेवा व पुनर्वसन क्षेत्रासाठी उपयुक्त
Dr. Akshata Gawade Research |
Dr. Akshata Gawade Research | ‘स्मार्ट कॉम्पॅक्ट अपर-लिम्ब फिजिओथेरपी डिव्हाईस’च्या डिझाईनला मान्यता
Published on
Updated on

कोल्हापूर : आरोग्यसेवा, पुनर्वसन व सहाय्यभूत तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या ‘स्मार्ट कॉम्पॅक्ट अपर-लिम्ब फिजिओथेरपी डिव्हाईस’ या अभिनव उपकरणाच्या डिझाईनची भारत सरकारच्या पेटंट कार्यालयातील अधिकृत नोंदणी झाली आहे. त्याचे प्रमाणपत्र १२ ऑगस्ट रोजी प्राप्त झाले.

संशोधनात डॉ. अक्षता गावडे यांच्यासह डॉ. ऋतुराज सैकिया, डॉ. प्रतिशा कुमारी, डॉ. जयश्री प्रेमकुमार शेट, डॉ. काझी कुतुबुद्दीन सय्यद लियाकत, डॉ. मैत्री चौधरी, डॉ. अनिमेष कुमार शर्मा, डॉ. ब्लेसिंग निमासजाई व राजेंद्र कुणवर यांचा सहभाग आहे. डॉ. गावडे गेली २० वर्षे नाईट कॉलेज ऑफ आर्टस्‌ अँड कॉमर्स, कोल्हापूर येथे कार्यरत आहेत. हात, मनगट, कोपर व खांद्याच्या हालचालींसाठी व्यायाम व पुनर्वसन प्रक्रियेत हे उपकरण उपयुक्त ठरू शकते. अपघातग्रस्त, स्ट्रोकनंतर पुनर्वसन घेणारे, ऑर्थोपेडिक व न्यूरोलॉजिकल रुग्ण, दिव्यांग तसेच वयोवृद्धांसाठी त्याची उपयुक्तता महत्त्वाची ठरू शकते.

आजच्या काळात पुनर्वसन सेवा अधिक सुलभ, वापरकर्ता-केंद्रित व तंत्रज्ञानाधारित करण्याची गरज आहे. पारंपरिक फिजिओथेरपीच्या जोडीला कॉम्पॅक्ट व स्मार्ट उपकरणांचा वापर वाढल्यास रुग्णांच्या पुनर्वसन प्रक्रियेला अधिक प्रभावी आधार मिळू शकतो. या दृष्टीने हे उपकरण महत्त्वपूर्ण संकल्पना म्हणून पुढे येत आहे. प्राचार्य डॉ. उत्तम पाटील, उपप्राचार्य डॉ. सुरेश फराकटे व समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ. महेंद्रकुमार जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news