Ajit Pawar | उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर

अजित पवार यांचे सकाळी नऊच्या सुमारास विमानतळावर आगमन होईल.
उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर
Ajit Pawar Online Pudhari
Published on
Updated on

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

उपमुख्यमंत्री अजित पवार रविवारी कोल्हापूर दौऱ्यावर येत असून जिल्ह्यात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अजित पवार यांचे सकाळी नऊच्या सुमारास विमानतळावर आगमन होईल. तेथून ते इचलकरंजीला रवाना होतील.

उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर
Horoscope Marathi : आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | रविवार, ४ ऑगस्‍ट २०२४

तेथे राजाराम स्टेडियममधील इचलकरंजी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या 'राष्ट्रवादी भवन' कार्यालयाचे उद्घाटन सकाळी १० वाजता त्यांच्या हस्ते होणार आहे. दुपारी १२ वाजता कोल्हापुरातील मार्केट यार्डमधील रामकृष्ण हॉलमध्ये त्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा 'जनसन्मान मेळावा' होणार असल्याचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांनी सांगितले. कागल शहरातील विकास कामांचे लोकार्पण उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते सायंकाळी पाच वाजता होणार आहे. या कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष भैया माने, गोकुळचे संचालक यवराज पाटील यांनी दिली,

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news