Dengue | डेंग्यूचा धोका कायम : 39 घरांमध्ये डासांच्या अळ्या

साथरोग विभागामार्फत कावीळ व डेंग्यूवरील दैनंदिन सर्वेक्षण सुरू
dengue-threat-continues-mosquito-larvae-found-in-39-houses
डेंग्यूचा धोका कायम : 39 घरांमध्ये डासांच्या अळ्या Pudhari File Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : महापालिकेच्या आरोग्य विभाग व आशा वर्कर्स यांच्या माध्यमातून शहरात गुरुवारी 3,694 घरांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 39 घरांमध्ये डेंग्यू पसरवणार्‍या डासांच्या अळ्या आढळून आल्या. साथरोग विभागामार्फत कावीळ व डेंग्यूवरील दैनंदिन सर्वेक्षण सुरू आहे.

या तपासणीत एकूण 15,582 नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली, यामध्ये 14 तापाचे रुग्ण आढळले. तसेच 2 नागरिकांचे रक्तजल नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. 4,487 घरांतील पाण्याच्या कंटेनरची तपासणी केली असता, 55 कंटेनरमध्ये डासांच्या अळ्या सापडल्या. हे सर्वेक्षण महाकाली मंदिर, संध्यामठ गल्ली, राजघाट रोड, रंकाळा रोड, शाहूपुरी, शाहूनगर, राजारामपुरी, ताराबाई पार्क, लक्ष्मीपुरी, न्यू पॅलेस, सोमवार पेठ, पाचगाव रोड, साळोखेनगर आदी परिसरांमध्ये केले. आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळावा, साठलेले पाणी रिकामे करावे आणि ताप आल्यास तातडीने नजीकच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news