Delivery Boy Theft | डिलिव्हरी बॉयनेच चोरले गोडावूनमधील चार लॅपटॉप

Delivery Boy Theft |
Delivery Boy Theft | डिलिव्हरी बॉयनेच चोरले गोडावूनमधील चार लॅपटॉप
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : नामांकित ई-कॉमर्स कंपनीच्या गोडावूनमधून डिलिव्हरी बॉयने चार लॅपटॉपची चोरी केल्याचे शनिवारी उघडकीस आले. याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी अथर्व प्रफुल्ल शिंदे (वय २०, रा. सरनाईकनगर, रायगड कॉलनी) याला अटक केली असून त्याच्याकडून ४ लाख २३ हजार रुपये किमतीचे चार लॅपटॉप जप्त केले. कंपनीमध्ये काम करत असताना त्याने ही चोरी केल्याचे समोर आले.

निर्माण चौक परिसरात एका नामांकित कंपनीचे गोडावून आहे. या गोडावूनमधून ऑनलाईन मागविलेल्या वस्तूंची डिलिव्हरी केली जाते. या ठिकाणी अथर्व शिंदे कामास होता. १० ऑक्टोबरला या गोडावूनमधून लॅपटॉप चोरीस गेल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबतची फिर्याद कंपनीचे मॅनेजर विद्यानंद रवींद्र कामत (रा. शिरोली, ता. हातकणंगले) यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दिली. याचा तपास करताना डिलिव्हरी बॉय अथर्व शिंदे याच्यावर पोलिसांचा संशय बळावला. त्याला ताब्यात घेण्यात आले.

चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच सप्टेंबर २०२५ मध्येही कंपनीच्या गोडावूनमधून तीन लॅपटॉप चोरीस गेले होते. याचीही चोरी संशयित अथर्व शिंदे यानेच केल्याचे उघडकीस आले. त्याने हे लॅपटॉप कमी किमतीत विकले होते. पोलिसांनी हे सर्व लॅपटॉप जप्त केले. दरम्यान, कंपनीच्या गोडावूनमधून चोरलेला महागडा बूटही मिळून आला. पोलिस निरीक्षक किरण लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news