kolhapur | कुटुंबाची बदनामी करून मुलाचे लग्न मोडले; अनोळखीवर गुन्हा दाखल

kolhapur Crime
kolhapur | कुटुंबाची बदनामी करून मुलाचे लग्न मोडले; अनोळखीवर गुन्हा दाखल File photo
Published on
Updated on

कोल्हापूर : कुटुंबाची बदनामी करून पुण्यात चांगल्या पगारावर नोकरी करणार्‍या उच्चशिक्षित मुलाचे लग्न मोडणार्‍या अनोळखीविरुद्ध शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मे 2025 ते जून 2025 या काळात घडला. न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नागाळा पार्क येथील पांडुरंग लोहकारे (वय 60, रा. महावीर कॉलेजसमोर, कोल्हापूर) यांनी फिर्याद दिली आहे. लोहकारे यांचा एकुलता मुलगा उच्चशिक्षित आणि पुण्यातील कंपनीत नोकरीला आहे. मुलाचे बार्शी (जि. सोलापूर) येथील मुलीशी विवाह निश्चित झाला. त्यानंतर अनोळखी व्यक्तीने मुलीच्या पालकांशी मोबाईलद्वारे संपर्क साधून कुटुंबीयांसह मुलाची बदनामी केली. एवढेच नव्हे, तर मुलीच्या वडिलांच्या मित्रांशीही संपर्क साधून अनोळखी व्यक्तीने मुलगा व कुटुंबीयांची निंदा नालस्ती केली. अनोळखीच्या कृत्यामुळे मुलाचे ठरलेले लग्न मोडल्याने लोहकारे यांनी यासंदर्भात शाहूपुरी पोलिस ठाण्याशी संपर्क साधून दि. 5 जुले 2025 मध्ये रितसर तक्रार अर्ज दिला; मात्र पोलिसांनी दखल घेतली नाही. लोहकारे यांनी न्यायालयात धाव घेतल्यानंतर कुटुंब, मुलाची बदनामी करणार्‍या संबंधित मोबाईल धारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा आदेश झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news