Robbery gang arrested | भरदिवसा बंद बंगले फोडणार्‍या टोळीला बेड्या

सात गुन्ह्यांची कबुली : दागिने, वाहनांसह 20.85 लाखांचा मुद्देमाल जप्त
कोल्हापूर : शहरासह ग्रामीण भागात टेहळणी करून बंद बंगले 
भरदिवसा फोडणार्‍या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने जेरबंद केले.
कोल्हापूर : शहरासह ग्रामीण भागात टेहळणी करून बंद बंगले भरदिवसा फोडणार्‍या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने जेरबंद केले. (छाया : पप्पू अत्तार)
Published on
Updated on

कोल्हापूर : गडहिंग्लज, आजरा, चंदगड, भुदरगडसह सीमा भागात टेहळणी करून बंद बंगले भर दिवसा फोडणार्‍या सराईत टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने बेड्या ठोकल्या. टोळीकडून सोने-चांदीचे दागिने, वाहनासह 20 लाख 85 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. टोळीने कोल्हापूर जिल्ह्यातील 7 गुन्ह्यांची कबुली दिली आहे. टोळीचा म्होरक्या मिरज तालुक्यातील नांद्रे येथील आहे.

म्होरक्या रज्जाक अस्लम मुजावर (वय 26, रा. नांद्रे, ता. मिरज, जि. सांगली), तेजस तानाजी पाटील (28, रा. कोरीवडे, ता. आजरा), विनायक सीताराम हरेर (32, रा. हत्तीवडे, ता. आजरा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. टोळीने गडहिंग्लजमधील दोन, आजरा दोन, चंदगड, दोडामार्ग, भुदरगड येथील प्रत्येकी एक अशा 7 गुन्ह्यांची कबुली दिली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी ही माहिती दिली.

संशयितांकडून 10 तोळ्याचे सोन्याचे दागिने, 230 ग्रॅम चांदी, ट्रॅक्टर, 3 दुचाकी व अन्य साहित्य असा 20 लाख 85 हजार किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. म्होरक्या मुजावर सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर सांगली जिल्ह्यात गुन्ह्यांचे रेकॉर्ड आहे. उजळाईवाडी हद्दीत भारती विद्यापीठ परिसरात सापळा रचून कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news