Dattwad voter list news | दत्तवाड येथे मतदार यादीत घोळ; यादीतून मतदारांची नावे झाली गायब

Missing names in voter list Maharashtra | निवडणुकीत जर आमच्या पसंतीचा उमेदवार चार मतांनीच पराभूत झाला तर याला जबाबदार कोण ? मतदारांचा सवाल
voter list news
voter list news
Published on
Updated on

दत्तवाड: दत्तवाड (ता. शिरोळ) येथे मतदार यादीमधून मतदारांची नावे गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार सध्या उघडीस आला आहे. मतदार यादीत घोळ असल्याचा आरोप येथील मतदारांनी केला आहे.

नुकतिच सर्वत्र जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका शांततेत पार पडल्या. दत्तवाड येथील एकूण सात मतदान केंद्रावर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूका पार पडल्या. दत्तवाड येथील रहिवासी असणारे अरविंदकुमार गिरगोंडा पाटील, युवराज आप्पासो पाटील - थोरात, महादेव बापू मिरजे, दौलतराव बाळासो घारगे या मतदारांचा मतदान यादीमध्ये नावे नसल्यामुळे त्यांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही. वरील सर्व व्यक्ती प्रत्येक निवडणुकीमध्ये आपले मतदानाचा हक्क गेल्या अनेक वर्षापासून बजावतात. मात्र गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांची नावे मतदान यादी मध्ये समाविष्ट नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांना त्यावेळीही मतदार यादीत नाव नसल्याने मतदानाचा हक्क बजावता आला नाही.

याबाबत त्यांनी पाठपुरावा करून दुबार नोंदणी निवडणूक आयोगाकडे केली होती. परंतु,तरीही जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा तोच प्रकार समोर आला असून या निवडणुकीमध्ये सुद्धा मतदार यादी मध्ये त्यांची नावे नाहीत. त्यामुळे मतदार यादी मध्ये झालेला घोळ पुन्हा एकदा समोर आल्याचे दिसून आले. त्यामुळे या निवडणुकीत जर आमच्या पसंतीचा उमेदवार चार मतांनीच पराभूत झाला तर याला जबाबदार कोण ? असा सवाल या मतदारांनी उपस्थित केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news