Manoj Jarange Patil
आदमापूर येथे बाळूमामाच्या समाधीवर नतमस्तक होऊन आशीर्वाद घेताना मराठा योद्धा मनोज जरांगे पाटीलPudhari Photo

मनोज जरांगे पाटील यांनी आदमापूर येथे बाळूमामाचे दर्शन

आदमापुरमध्ये जरांगे पाटलांचे जल्लोषी स्वागत
Published on

मुदाळतिट्टा : पुढारी वृत्तसेवा

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्रीक्षेत्र आदमापुर ता. भुदरगड येथे संत सद्गुरु बाळूमामा यांच्या समाधीस्थळी नतमस्तक होऊन मनोज जरांगे पाटील यांनी बाळूमामांचे आशीर्वाद घेतला. मराठा आरक्षण प्रश्न सुरू असलेल्या लढ्यास बाळूमामा यश द्या अशी मागणी त्यांनी यावेळी केली. प्रारंभी आदमापूर येथे मनोज जरांगे पाटील यांचे जल्लोषी वातावरणामध्ये स्वागत करण्यात आले. जरांगे साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है बाळूमामाच्या नावानं चांगभलं अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

Manoj Jarange Patil
आरक्षण मिळेपर्यंत नेत्यांच्या दारात फिरकू नका, धुळ्यात मनोज जरांगे-पाटील यांचे आवाहन

राधानगरी भुदरगड कागल तालुक्यातील हजारो कार्यकर्त्यांनी यावेळी मोठी गर्दी केली. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा यावेळी बाळूमामा देवालयाच्या वतीने आशीर्वाद नारळ बाळूमामाचे पुस्तक काठी व घोंगडे, पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. सकल मराठा समाज आदमापूर यांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला राधानगरी भुदरगड कागल या तिन्ही तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. सचिव संदीप मगदूम, दिनकरराव कांबळे, यशवंतराव पाटील, संभाजी पाटील, विजयराव गुरव, निवास पाटील, चंद्रकांत पाटील , दिग्विजय पाटील, संजय मोरबाळे, रामचंद्र पाटील, नामदेव पाटील यांच्यासह सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. मुरगूड,निढोरी, मुदाळ तिट्टा या ठिकाणी सुद्धा मनोज जरंगे पाटील यांचे सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोशी स्वागत केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news