Danoli Crocodile Sighting | दानोळीतील तांबोळी मळी परिसरात मगरीचा वावर

शेतकर्‍यांमध्ये घबराट; बंदोबस्त करण्याची मागणी
Danoli Crocodile Sighting
दानोळी : येथील तांबोळी मळी परिसरात पहुडलेली मगर.
Published on
Updated on

दानोळी : दानोळी (ता. शिरोळ) येथील वारणा नदीकाठावरील तांबोळी मळी परिसरात मोठी मगर गवताच्या कुरणात पहुडलेली पाहावयास मिळत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या परिसरात शेतकरी, शेतमजूर व मेढपाळांची नियमित वर्दळ असते. त्यामुळे वन विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

वारणा नदीच्या काठालगत असलेल्या गवताळ भागात ही मगर दिवसाढवळ्या राजरोसपणे उन्हात पडून राहते. नदीकिनारी असलेल्या शेतांमध्ये गवत कापण्यासाठी, जनावरांना चारा गोळा करण्यासाठी शेतकर्‍यांना जावे लागते. अशा ठिकाणी मगर वारंवार दिसू लागल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गतवर्षी एक मेंढी व एका शेळीचा मगरीने फडशा पाडला होता, तर नुकताच संस्कार गावडे या मेंढपाळाच्या पाळीव कुत्र्याला मगरीने ठार केले होते. या मगरीचा तत्काळ बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरू लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news