Danoli Murder Case | दानोळी खून : चार संशयितांना अटक

Danoli Murder Case |
संशयित आरोपींना न्‍यायालयात नेताना.
Published on: 
Updated on: 

जयसिंगपूर : जमीन व्‍यवहार व अन्‍य कारणांतून दानोळी (ता. शिरोळ) येथील रेकॉर्डवरील गुन्‍हेगार महेश बजरंग दळवी (वय ४१) याचा खून झाल्‍याचे प्राथमिक तपासात पुढे येत आहे. याप्रकरणी रोहित भूपाल मगदूम (३६, रा. उमळवाड, ता. शिरोळ), संतोष भीमराव कोळी (२७, रा. चांदोली वसाहत, दानोळी, ता. शिरोळ), अनमोल सुनील करे (३३, रा. कोथळी, ता. शिरोळ) व अश्विनकुमार ऊर्फ ऋषीकेश राजेंद्र भोई (२९, रा. हारुगडे प्लॉट, सांगलीवाडी, सांगली) या संशयित आरोपींना अटक केली. न्यायालयाने त्यांना ३१ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

मिळालेली माहिती अशी, दानोळी येथील महेश दळवी याची १९ ऑक्टोबर रोजी बंदुकीने गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली होती. घटनेनंतर पोलिसांनी पाच पथकांच्‍याव्‍दारे तपास सुरू केला होता. यात सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीच्‍या आधारे संशयित आरोपींना हातकणंगले परिसरातून ताब्‍यात घेण्यात आले आहे. प्राथमिक तपासात संशयितांनी गुन्‍ह्याची कबुली दिली आहे. संशयित मगदूम व भोई या दोघांवर गुन्‍हा दाखल आहे. गुन्ह्यात वापरलेली बंदूक अद्याप पोलिसांना मिळालेली नाही. पूर्वनियोजित कटकारस्‍थान व रेकी करून हा खून केल्‍याचे समोर आले आहे. तसेच या खुनामागे आणखी काही कारणे आहेत का, याचा पोलिस तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news