Pudhari Tourism Exhibition | दै. ‘पुढारी’ टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे भव्य प्रदर्शन लवकरच; पर्यटनप्रेमींना पर्वणी

कोल्हापूर, सांगली, बेळगावमध्ये टुरिझमचा उत्सव; एकाच छताखाली मिळणार सर्व काही
Pudhari Tourism Exhibition |
दै. ‘पुढारी’ टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे भव्य प्रदर्शन लवकरच; पर्यटनप्रेमींना पर्वणीPudhari File Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रातील पर्यटनप्रेमींना दरवर्षी प्रतीक्षा असलेल्या दैनिक ‘पुढारी’ आयोजित टूर्स अँड ट्रॅव्हल्स एक्झिबिशनच्या तारखा अखेर जाहीर झाल्या आहेत. यावर्षी ‘गगन टूर्स’ प्रस्तुत आणि ‘अ हेवन हॉलिडेज’ पॉवर्ड बाय हे भव्य प्रदर्शन कोल्हापूर, सांगली आणि बेळगावमध्ये आयोजित करण्यात आले आहे. दरवर्षी दोन शहरांत मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता यंदा हे प्रदर्शन प्रथमच बेळगावमध्येही आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन म्हणजे पर्यटनाच्या दुनियेतील एक महासोहळाच असतो. या प्रदर्शनात एकाच छताखाली विविध टूर पॅकेजेस, देश-विदेशातील सहलींची सविस्तर माहिती, पर्यटन व्यवसायातील नवनवीन ट्रेंडस् आणि आपल्या स्वप्नातील सुट्टीचे आगाऊ व अचूक नियोजन करण्याची अनोखी संधी नागरिकांना मिळणार आहे.

ग्राहकांसाठी संधींची खाण

हे प्रदर्शन म्हणजे ग्राहकांसाठी एकाच ठिकाणी माहितीचा आणि संधींचा खजिना असतो. हिमाचलच्या बर्फाळ डोंगररांगांपासून ते केरळच्या शांत बॅकवॉटर्सपर्यंत आणि युरोपच्या ऐतिहासिक शहरांपासून ते दुबईच्या आधुनिक वैभवापर्यंतचे असंख्य पर्याय येथे उपलब्ध असतील. कौटुंबिक सहली, हनिमून पॅकेजेस, साहसी पर्यटन, बजेट टुर्स आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष यात्रा अशा सर्व प्रकारच्या सहलींची माहिती येथे मिळेल. तज्ज्ञांशी थेट संवाद साधून आपल्या बजेटनुसार आणि वेळेनुसार सहल ‘कस्टमाईज’ करून घेण्याची सोय हे या प्रदर्शनाचे मुख्य वैशिष्ट्य असेल. याशिवाय केवळ प्रदर्शनासाठी असलेल्या खास सवलती आणि ऑफर्सचा लाभही ग्राहकांना घेता येणार आहे.

टूर कंपन्यांसाठी हक्काचे व्यासपीठ

हे प्रदर्शन केवळ ग्राहकांसाठीच नव्हे, तर पर्यटन व्यवसायातील कंपन्यांसाठीही एक मोठी संधी असते. हजारो संभाव्य आणि उत्सुक ग्राहकांना थेट भेटण्याची, आपल्या टूर पॅकेजेसची वैशिष्ट्ये समजावून सांगण्याची आणि ग्राहकांच्या मनात विश्वास निर्माण करण्याची संधी कंपन्यांना मिळणार आहे. या प्रदर्शनात ग्राहकांशी होणारा थेट संवाद अधिक प्रभावी ठरतो त्यातून कंपन्यांना वर्षभर ग्राहक मिळत असतो. आपल्या खास ऑफर्स थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवून जागेवरच बुकिंग मिळवण्यासाठी हे प्रदर्शन एक उत्तम माध्यम आहे.

दैनिक ‘पुढारी’चे हे प्रदर्शन ग्राहक आणि व्यावसायिक या दोघांसाठीही एक ‘विन-विन’ सिच्युएशन निर्माण करणारे आहे. बेळगावमध्ये आयोजन होत असल्याने सीमाभागातील पर्यटनप्रेमींना देश-विदेशातील टूर्स पॅकेजेसची माहिती मिळणार आहे.

टूर अँड ट्रॅव्हल्स प्रदर्शनाची ठिकाणे आणि वेळ

कोल्हापूर : 2, 3, 4 ऑगस्ट

वेळ : सकाळी 10 ते रात्री 8

स्थळ : डॉ. व्ही. टी. पाटील स्मृती भवन, राजारामपुरी, कोल्हापूर.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news