Crop Damage Inspection | करवीर, कागल तालुक्यात पिकांचे पंचनाम सुरू

२० टक्क्यांऐवजी संपूर्ण १०० टक्के सर्वेक्षणाचे आदेश
कोल्हापूर : गिरगाव (ता. करवीर) येथे गुरुवारी पंचनामे सुरू असतानाचे एआयनिर्मित छायाचित्र.
कोल्हापूर : गिरगाव (ता. करवीर) येथे गुरुवारी पंचनामे सुरू असतानाचे एआयनिर्मित छायाचित्र.
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत असलेल्या चार तालुक्यांपैकी गडहिंग्लज आणि हातकणंगले तालुके दुष्काळग्रस्त म्हणून घोषित झाले. यामुळे उर्वरित करवीर आणि कागल तालुक्याचे दुष्काळासाठी गुरुवारी सर्वेक्षण सुरू झाले. या दोन्ही तालुक्यांत संपूर्ण पिकांचे पंचनामे केले जाणार असून, त्याबाबतचा अहवाल लवकरच दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीला सादर केला जाणार आहे.

राज्य शासनाने २५ सप्टेंबर २०२६ रोजीच्या आदेशानुसार जिल्ह्यातील राधानगरी, गगनबावडा, भुदरगड, आजरा, चंदगड आणि पन्हाळा हे सहा तालुके दुष्काळी म्हणून घोषित केले. यानंतर ऑक्टोबर २०२६ मध्ये जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत शाहूवाडी आणि शिरोळ या आणखी दोन तालुक्यांचा समावेश करण्यात आला. यामुळे जिल्ह्यातील १२ पैकी ८ तालुके दुष्काळी झाले. उर्वरित चार तालुक्यांतही दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होती.

दरम्यान, मंगळवारी (दि.१७) झालेल्या दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत जिल्ह्यातील हातकणंगले, गडहिंग्लज, कागल, करवीर या तालुक्यांचे दुष्काळ जाहीर करण्यासाठी आवश्यक निकषांनुसार सर्वेक्षण करा. त्यानुसार २० टक्के पिकांचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यापैकी गडहिंग्लज आणि हातकणंगले तालुक्याचा अहवाल प्राप्त होताच, या तालुक्यांनाही दुष्काळी यादीत समाविष्ट करण्यात आले.

यामुळे जिल्ह्यातील उर्वरित करवीर आणि कागल या दोन तालुक्यांत आजपासून पंचनामे करण्यास सुरुवात झाली. मात्र, या तालुक्यांतील संपूर्ण (१०० टक्के) पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पंचनामे करण्याचे आदेश यंत्रणेला दिले असून, गुरुवारी सकाळी ८ वाजल्यापासूनच त्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.