CPR Hospital | नर्सेस व कर्मचारी मारहाणीच्या निषेधार्थ सीपीआरमध्ये आंदोलन

CPR Hospital  |
कोल्हापूर : कल्याण - डोंबिवली येथील रुग्णालयात झालेल्या मारहाण घटनेच्या निषेधार्थ आंदोलन करताना सीपीआरच्या नर्सेस.
Published on
Updated on

कोल्हापूर : कल्याण - डोंबिवली येथील रुग्णालयात नर्सेस व आरोग्य कर्मचाऱ्यांवर झालेल्या हल्ला, मारहाण व अवमानकारक वर्तनाच्या निषेधार्थ महाराष्ट्र गव्हर्न्मेंट नर्सेस फेडरेशनने शुक्रवारी सकाळी सीपीआर परिसरात निदर्शने केली. हल्ला करणाऱ्या नगरसेवक व संबंधित पदाधिकाऱ्यांना तातडीने पदावरून हटवा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

आरोग्य कर्मचाऱ्यांवरील वाढत्या हल्ल्यांच्या निषधार्थ सीपीआर येथील नर्सेस व आरोग्य कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून दिवसभर काम केले. ‘हल्लेखोरांचा धिक्कार असो, हल्ला करणाऱ्यांना पदावरून निलंबित करा, सरकार होश मे आव होश आव’ अशा घोषणांनी सीपीआर परिसर दणाणून सोडला. अशा प्रकारच्या घडणाऱ्या घटनांमुळे आरोग्य कर्मचाऱ्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली. नर्सेस फेडरेशनच्या जिल्हाध्यक्ष हशमत हवेरी, पूजा शिंदे, सुजाता उरुणकर, प्रवीण शिंदे, ज्ञानेश्वर मुठे, मनुजा रेणके, माणसी मुळे यांच्यासह पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news