कोल्‍हापूर : लाचेची मागणी केल्याप्रकरणी चंदगड पोलीस ठाण्याचा हवालदार जेरबंद

कोल्‍हापूर : लाचेची मागणी केल्याप्रकरणी चंदगड पोलीस ठाण्याचा हवालदार जेरबंद

कोल्हापूर पुढारी वृत्तसेवा दाखल गुन्ह्यात अटकेची कारवाई टाळण्यासाठी साडेचार हजार रूपये लाचेची मागणी केल्याप्रकरणी चंदगड पोलीस ठाण्यातील हवालदार राजीव शामराव जाधव (वय 44 राहणार गडहिंग्लज) याला आज (शुक्रवार) एसीबीने जेरबंद केले. चंदगड पोलीस ठाण्यात ही कारवाई करण्यात आली.

तक्रारदार व्यक्तीविरुद्ध चंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. संबंधित तक्रारदाराला बोलावून दाखल गुन्ह्यात अटक न करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाचेची मागणी केली. तडजोडीत हा सौदा चार हजार पाचशे रुपयात ठरला.

तक्रारदार व्यक्तीने या प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक पथकाचे पोलीस उपाधीक्षक सरदार नाळे यांची भेट घेऊन लेखी तक्रार दाखल केली. पथकाने केलेल्या पडताळणीत तथ्य आढळून आले.

हवालदार राजीव जाधव यांच्याविरुद्ध चंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचखोरीच्या जाळ्यात पोलीस हवालदार सापडल्याने पोलीस खात्यात खळबळ उडाली आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news