

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी बहुचर्चित असणारी काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी शुक्रवारी रात्री उशिरा जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी जाहीर केली. अनेक दिवसांपासून प्रचंड उत्सुकता असलेल्या या यादीकडे इच्छुकांसह सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. या यादीत पक्षाने अनुभवाला प्राधान्य देत तब्बल 17 माजी नगरसेवकांना पुन्हा संधी दिली आहे. विशेष म्हणजे 13 माजी नगरसेवकांच्या कुटुंबीयांचाही यादीत समावेश आहे.
काँग्रेसने जिंकण्याची क्षमता आणि स्थानिक प्रभाव हे निकष उमेदवार निवडीसाठी लावले आहेत. महापालिकेतील कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी आमदारकीची निवडणूक लढवलेल्या उमेदवाराला महापालिकेच्या रिंगणात उमेदवारी देऊन पुन्हा उतरविले आहे. त्यामुळे काही प्रभागांमध्ये काँग्रेसला त्याचा फायदा होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. काही माजी नगरसेवकांना डच्चू दिल्याने नाराजी व्यक्त होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पक्षासाठी काम करणार्या काही जुन्या चेहर्यांबरोबर नवीन चेहर्यांनाही संधी दिला आहे. उर्वरीत यादी दोन दिवसात जाहीर करण्यात येणार आहे.
उमेदवारी जाहीर झालेल्यांची नावे व प्रभाग आणि आरक्षण पुढील प्रमाणे.
प्र. 2 नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला : आरती दीपक शेळके, प्र. 3 नागरिकांचा मागास प्रवर्ग : प्रकाश शंकरराव पाटील, प्र. 3 सर्वसाधारण महिला : किरण स्वप्नील तसलीदार, प्र. 4 : अनुसूचित जाती महिला : स्वाती सचिन कांबळे, प्र. 4 नागरिकांचा मागास प्रवर्ग : विशाल शिवाजी चव्हाण. प्र. 4 सर्वसाधारण महिला : दिपाली राजेंश घाटगे. प्र. 4 सर्वसाधारण : राजेश भरत लाटकर, प्र. 5 सर्वसाधारण : अर्जुन आनंद माने प्र. 6 : अनुसूचित जाती : रजनीकांत जयसिंग सरनाईक, प्र. 6 सर्वसाधारण महिला : तनिष्का धनंजय सावंत, प्र. 6 सर्वसाधारण : प्रतापसिंह दत्तात्रय जाधव, प्र. 7 : सर्वसाधारण महिला : उमा शिवानंद वाळखे, प्र. 8 नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला : अक्षता अभिजीत पाटील, प्र. 8 : सर्वसाधारण महिला : ऋग्वेदा राहुल माने, प्र. 8 सर्वसाधारण : प्रशांत उर्फ भैय्या महादेव हेडकर, प्र. 8 सर्वसाधारण : इंद्रजीत पंडितराव बोंद्रे, प्र. 9 : सर्वसाधारण महिला : पल्लवी सोमनाथ बोळाईकर, प्र. 9 : सर्वसाधारण महिला : विद्या सुनील देसाई, प्र. 9 : सर्वसाधारण : राहुल शिवाजीराव माने, प्र. 10 सर्वसाधारण महिला : दिपा दिलीपराव मगदूम, प्र. 11 नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला : जयश्री सचिन चव्हाण, प्र.12 नागरिकांचा मागास प्रवर्ग : रियाज अहमद सुभेदार, प्र. 12 सर्वसाधारण महिला : स्वालिया साहील बागवान, प्र.12 सर्वसाधारण महिला : अनुराधा अभिमन्यू मुळीक, प्र.12 सर्वसाधारण : ईश्वर शांतिलाल परमार, प्र. 13 : अनुसूचित जाती महिला : पुजा भूपाल शेटे, प्र. 13 सर्वसाधारण ड्ढ प्रविण हरिदास सोनवणे, प्र. 14 : नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला :दिलशाद अब्दुलसत्तार मुल्ला, प्र. 14 सर्वसाधारण : अमर प्रणव समर्थ, प्र. 14 सर्वसाधारण : विनायक विलासराव फाळके, प्र. 15 सर्वसाधारण महिला : अश्विनी अनिल कदम, प्र. 15 सर्वसाधारण : संजय वसंतराव मोहिते, प्र. 16 : नागरिकांचा मागास प्रवर्ग : उमेश देवप्पा पवार, प्र. 16 सर्वसाधारण : उत्तम उर्फ भैय्या वसंतराव शेटके, प्र. 17 अनुसूचित जाती महिला : अर्चना संदीप बिरांजे, प्रभाग 17 सर्वसाधारण महिला शुभांगी शशिकांत पाटील, प्र. 17 सर्वसाधारण : प्रविण लक्ष्मणराव कासरकर, प्र.18 अनुसूचित जाती महिला : अरुणा विशाल गवळी, प्र. 18 : सर्वसाधारण : भुपाल महिपती शेटे, प्र. 18 सर्वसाधारण : सर्जेराव शामराव साळुंखे, प्र. 19 : अनुसूचित जाती : दुर्वास परशुराम कदम, प्र. 19 सर्वसाधाण महिला : सुषमा संतोष जरग, प्र. 19 : सर्वसाधारण : मधुकर बापू रामाणे, प्र. 20 अनुसूचित जाती महिला : जयश्री धनाजी कांबळे, प्र. 20 नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला : उत्कर्षा आकाश शिंदे, प्र. 20 नागरिकांचा मागास प्रवर्ग : धिरज भिवा पाटील, प्र. 20 सर्वसाधारण महिला : मयुरी इंद्रजित बोंद्रे, प्र. 20 सर्वसाधारण : राजू आनंदराव दिंडोर्ले (पुरस्कृत)