हसन मुश्रीफ यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव

Congratulations MLA Hassan Mushrif | कार्यकर्त्यांसह, सामान्य जनतेची शुभेच्छा देण्यासाठी गर्दी
Congratulations MLA Hassan Mushrif
कागल येथे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे अभिनंदन करताना कार्यकर्ते, सामान्य जनता Pudhari Photo
Published on
Updated on

कागल : नुकत्‍याच झालेल्‍या विधानसभा निवडणूकीत कागल मतदारसंघातून विजयी झालेले पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अभिनंदनासाठी कागलमधील त्यांच्या घराकडे रीघ सुरू होती. कागल- गडहिंग्लज- उत्तूर विधानसभा मतदार संघातील सर्वसामान्य जनतेसह कार्यकर्ते पदाधिकारी आणि मान्यवरांचा यामध्ये समावेश आहे. विशेष म्हणजे आबाल- वृद्धांसह महिलांचाही सहभाग मोठा होता.

पालकमंत्री हसन मुश्रीफ आज सकाळी साडेसात वाजता महालक्ष्मी एक्सप्रेसने कोल्हापुरात उतरले. कोल्हापूरहून कागलकडे येत असताना राज्य परिवहन महामंडळाच्या कागल आगारासमोर कर्मचारी व अधिकाऱ्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. माझी खासदार श्रीमती निवेदिता माने, श्रीमती प्रविता सालपे, गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील- गिजवणेकर, आजरा पंचायत समितीचे माजी सभापती शिरीष देसाई, गोडसाखरचे अध्यक्ष प्रकाशभाई पताडे, उपाध्यक्ष प्रकाशराव चव्हाण, बिद्री साखर कारखान्याचे संचालक आर. व्ही. पाटील, ए. वाय. पाटील- म्हाकवेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव धुरे, राजेंद्र माने, श्रीनाथ उद्योग समूहाचे संस्थापक चंद्रकांत गवळी माजी नगराध्यक्ष नवल बोते तसेच विविध संस्था- संघटनांचे प्रतिनिधी व पदाधिकारी यांनी भेटून अभिनंदन केले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडूनही अभिनंदन......

स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही निवडणुकीच्या तोंडावरच मुश्रीफ यांना पाठिंबा दिला होता. संघटनेचे तालुकाध्यक्ष. बाळासाहेब पाटील, संभाजीराव यादव, नितेश कोगनोळे, शिवाजी पाटील, आदी पदाधिकाऱ्यांनी एकत्रित भेटून मुश्रीफ यांचे अभिनंदन केले.

कागल- पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरासमोर गुरुवारी सकाळी जमलेली अभिनंदनासाठी जमलेली गर्दी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news