

कोल्हापूर : शहरात सोमवारी (दि. २६) व मंगळवारी (दि. २७) दोन दिवस अपुरा पाणीपुरवठा होणार आहे. काळम्मावाडी योजनेच्या ३३ केव्ही उच्चदाब वाहिनीवरील एक्स्प्रेस फिडर लाईनवर आयसोलेटर बसविण्याचे काम महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमार्फत होणार आहे. परिणामी, दोन दिवस विद्युत पुरवठा बंद असेल. त्यामुळे अपुरा पाणीपुरवठा होईल. तसेच बुधवारही (दि. २८) कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
शहरातील ए व बी वॉर्ड : पुईखडी, कलिकतेनगर, सुलोचना पार्क, इंगवले कॉलनी, नाना पाटीलनगर, जिवबानाना पार्क, बापूरामनगर, साळोखेनगर, राजीव गांधी वसाहत, कात्यायणी कॉम्प्लेक्स, तपोवन, देवकर पाणंद, मोरे-मानेनगर, संभाजीनगर स्टँड, नाळे कॉलनी, रामानंदनगर, बालाजी पार्क, शाहू कॉलनी, सासणे कॉलनी, रायगड कॉलनी, जरगनगर, सुभाषनगर, शेंडापार्क, आर. के. नगर, भारती विद्यापीठ, म्हाडा कॉलनी, संभाजीनगर, गंजीमाळ, संपूर्ण शिवाजी पेठ, राज कपूर पुतळा परिसर, संपूर्ण मंगळवार पेठ, पोतनीस बोळ, मंगेशकरनगर, बेलबाग, महालक्ष्मीनगर, सरनाईक वसाहत, नेहरूनगर, वाय. पी. पोवारनगर, जवाहरनगर व संलग्न ग्रामीण भागांमध्ये पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे.
ई वॉर्ड : संपूर्ण राजारामपुरी, शाहू मिल परिसर, शाहू मिल कॉलनी, वैभव हौसिंग सोसायटी, ग्रीनपार्क, शांतीनिकेतन, रेव्हेन्यू कॉलनी, अरुणोदय, राजेंद्रनगर, चौगुले हायस्कूल परिसर, सम्राटनगर, प्रतिभानगर, इंगळेनगर, दौलतनगर, उद्यमनगर, शास्त्रीनगर, पांजरपोळ, दत्तगल्ली, यादवनगर, कामगार चाळ, जगदाळे कॉलनी, महावीरनगर, अश्विनीनगर, जागृती नगर, पायमल वसाहत, अंबाई डिफेन्स, राजाराम रायफल, काटकरमाळ, बावडा फिल्टर हाऊसवर अवलंबून असलेला संपूर्ण कसबा बावडा, लाईन बाजार, लोणार वसाहत, राजीव गांधी वसाहत, महाडीक वसाहत, रुईकर कॉलनी, लिशा हॉटेल परिसर, सदरबाजार, कदमवाडी, जाधववाडी, बापट कॅम्प, शिवाजी पार्क, फ्रेंडस् कॉलनी, ताराबाई पार्क, नागाळा पार्क, रमणमळा, शालिनी पॅलेस, मुक्त सैनिक वसाहत, मार्केट यार्ड, सी. बी. एस. स्टेशन रोड, साईक्स एक्स्टेंशन, न्यू शाहूपुरी, खानविलकर पेट्रोल पंप परिसर, शाहूपुरी व्यापारपेठ, व्हीनस कॉर्नर, शाहूपुरीतील गल्ली क्रमांक १ ते ४, बी. टी. कॉलेज, संपूर्ण टेंबलाईवाडी व पाच बंगला परिसर आदी भागांत पाणीपुरवठा कमी दाबाने होण्याची शक्यता आहे.