Dhananjay Mahadik| मुख्‍यमंत्र्यांनी गोकुळला डी. वाय. पाटील दूध संघ होण्‍यापासून वाचवले

खासदार धनंजय महाडिक यांचा घणाघात
Dhananjay Mahadik
Dhananjay Mahadik
Published on: 
Updated on: 

कोल्‍हापूर : मुख्‍यमंत्री, दोन्‍ही उपमुख्‍यमंत्री यांनी गोकुळमध्‍ये शासन नियुक्‍त संचालकांची नियुक्‍ती करून त्‍यांना मतदानाचा अधिकार देण्‍याचा कायदा करत गोकुळला डी. वाय. पाटील दूध संघ होण्‍यापासून वाचविले असल्‍याची घणाघाती टीका खा. धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषदेत केली. तसेच कोरमची तांत्रिक अडचण करत अडवणूक केली जात असल्‍याचा फेक नॅरेटिव्‍ह पसरवत आ. पाटील महाराष्‍ट्राची दिशाभूल करत असल्‍याचा आरोपही त्यां‍नी केला.

खा. महाडिक म्हणाले, कोल्‍हापूरच्‍या माजी पालकमंत्र्यांचा इतिहास जिल्‍ह्याला माहीत आहे. राजकारणात एका मतालाही खूप महत्त्‍व आहे. अध्‍यक्ष निवडीबाबत त्‍यांनी यापूर्वीच गोकुळमध्‍ये एकत्र सत्ता चालवूया असा प्रस्‍ताव देणे आवश्‍यक होते. पण, ते कोरमच्‍या संख्‍येवरून समविचारीचा अध्‍यक्ष होण्‍यापासून अडवणूक केली जात असल्‍याचा फेक नॅरेटिव्‍ह पसरवत आहेत.

दिवाळीत वेठीस धरण्‍याचे काम

दिवाळी सणामध्‍ये मोर्चा काढून आ. पाटील लोकांना वेठीस धरण्‍याचे काम करत आहेत. सणासुदीचे दिवस असल्‍याने या मोर्चाचा परिणाम व्‍यापारावर होणार आहे. पण, ते याचा विचार करणार नाहीत. त्‍याच्‍या राजकारणासाठी ते काय करतील हे माहीत नसल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

शासनाचे पाठबळ आवश्‍यक

गोकुळवर प्रशासक आणणे अवघड नव्‍हते. पण, मुख्‍यमंत्र्यांनी गोकुळची सत्ता २५ संचालकांच्‍या हातात दिली. पुढील काळातही दूध उत्‍पादनाचा खर्च वाढणार आहे. अशा आव्‍हानात्‍मक परिस्‍थितीत गोकुळला शासनाचे पाठबळ आवश्‍यक आहे. मात्र, गोकुळ ताब्‍यात घेण्‍यासाठी या हालचाली सुरू असल्‍याचा रंग विरोधकांकडून दिला जात असल्‍याचा आरोप खा. महाडिक यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.