CM Devendra Fadnavis | पुणे शिक्षक मतदारसंघात कौस्तुभ गावडे इतिहास घडविणार

मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास; महायुतीचा शिक्षक, संस्थाचालक महामेळावा उत्साहात
कोल्हापूर : पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजप-महायुतीचे उमेदवार कौस्तुभ गावडे व डॉ. स्मिता जाधव यांच्या विजयाचा निर्धार करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. समवेत मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री चंद्रकांत पाटील, आ. विनय कोरे, महापौर रूपाराणी निकम आदी.
कोल्हापूर : पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजप-महायुतीचे उमेदवार कौस्तुभ गावडे व डॉ. स्मिता जाधव यांच्या विजयाचा निर्धार करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. समवेत मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री चंद्रकांत पाटील, आ. विनय कोरे, महापौर रूपाराणी निकम आदी.
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजप-महायुतीचे अधिकृत उमेदवार शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे इतिहास घडवतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. शिक्षकांच्या प्रश्नांची जाण असणारा व त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सातत्याने पाठपुरावा करणारा सक्षम प्रतिनिधी विधानपरिषदेत पाठविण्यासाठी सर्व शिक्षक व संस्थाचालकांनी एकजुटीने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.

धैर्यप्रसाद सांस्कृतिक भवन येथे आयोजित महायुतीच्या शिक्षक व संस्थाचालक महामेळाव्यात ते बोलत होते. शिक्षकांच्या सेवाविषयक समस्या, प्रलंबित मागण्या आणि संस्थाचालकांच्या अडचणी सोडविण्यासाठी आपण सदैव तत्पर राहू, अशी ग्वाही उमेदवार कौस्तुभ गावडे यांनी दिली. गरज पडल्यास रात्री बारा वाजताही मुख्यमंत्र्यांना फोन करून शिक्षकांचे काम करून घेईन. केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कृतीतून प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करीन, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

महामेळाव्यात वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील आणि भैया माने, पुणे पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव यांनी मनोगत व्यक्त केली. शिक्षकांचे प्रश्न शासनदरबारी प्रभावीपणे मांडण्यासाठी सक्षम नेतृत्वाची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. गावडे यांच्या विजयासाठी महायुतीच्या सर्व घटकांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी महापौर रूपाराणी निकम, खासदार धनंजय महाडिक, आमदार विनय कोरे, समरजित घाटगे, आ. अशोकराव माने, माजी आ. प्रकाश आवाडे, आ. राहुल आवाडे, माजी खा. सुजय विखे-पाटील, माजी आ. सुरेश हाळवणकर, आ. अमल महाडिक, प्राचार्य अभयकुमार साळुंखे, समीत कदम, कृष्णराज महाडिक आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news