HSC Exam: बारावीची शुक्रवारपासून प्रात्यक्षिक परीक्षा

विभागीय शिक्षण मंडळाकडून परीक्षा केंद्रांना साहित्य पोहोच
HSC Exam
HSC Exam: बारावीची शुक्रवारपासून प्रात्यक्षिक परीक्षाFile Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीची तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा शुक्रवारपासून (दि. 23) सरू होणार आहे. विभागीय शिक्षण मंडळाकडून प्रात्यक्षिक परीक्षेचे साहित्य केंद्रावर पोहोच करण्यात आल्याची माहिती कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. सुभाष चौगुले यांनी दिली.

बारावीची लेखी परीक्षा 10 फेबुवारी ते 18 मार्च या कालावधीत होणार आहे. त्याअगोदर 23 जानेवारी ते 9 फेबुवारीपर्यंत तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा चालणार आहेत. विभागीय शिक्षण मंडळाने उत्तरपत्रिका, लॉग टेबल, लिखाणाचे नमुने यासह अन्य साहित्य परीक्षा केंद्रावर पाठवले आहे. तोंडी परीक्षा कशी घ्यायची, तोंडी परीक्षेचे गुण कशा पद्धतीने भरायचे याबद्दल सूचना दिल्या आहेत. नियमित व बाह्य विद्यार्थ्यांची यादी प्रत्येक शिक्षण संस्थांना दिली आहे. विज्ञान विषयातील भौतिकशास्त्र, रसायन शास्त्र, जीवशास्त्र विषयांची प्रात्यक्षिक परीक्षा 30 गुणांची आहे; तर इतर विषयांची प्रात्यक्षिक परीक्षा 20 गुणांची आहे. ज्या विषयांची प्रात्यक्षिक परीक्षा 30 गुणांची, त्याचा लेखी पेपर 70 गुणांचा होईल. तर ज्या विषयांची प्रात्यक्षिक परीक्षा 20 गुणांची त्या विषयांचा लेखी पेपर 80 गुणांचा असणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news