

कोल्हापूर : अकरावी ऑनलाईन केंद्रीय प्रवेश प्रक्रियेंतर्गत सोमवार (दि.11) पासून भाग-1 व 2 भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांना https:/// mahafyjcadmission. in या अधिकृत संकेतस्थळावर प्रवेश नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
माध्यमिक व उच्चशिक्षण संचालनालयाने ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया शून्य फेरी व नियमित कॅप फेरी 1 चे वेळापत्रक जाहीर केले आहे. अकरावी प्रवेशांतर्गत 11 ते 13 मे या कालावधीत शैक्षणिक पात्रता माहिती, भाग-2 ऑनलाईन अर्ज करणे, कनिष्ठ महाविद्यालये प्राधान्यक्रम भरण्याची प्रक्रिया चालणार आहे. 14 व 15 मे रोजी तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रदर्शित होईल. 16 मे रोजी गुणवत्ता यादीवर हरकती, तक्रार निवारण प्रक्रिया होईल. 18 व 19 मे रोजी अंतिम गुणवत्ता यादी, अल्पसंख्याक, इन हाऊस कोटासाठी झीरो राऊंडसाठी महाविद्यालय यादी व रिक्त जागा प्रदर्शित केली जातील. 20 मे रोजी पहिल्या फेरीसाठी रिक्त जागा प्रसिद्ध केल्या जाणार आहेत, अशी माहिती कोल्हापूर विभागीय शिक्षण उपसंचालक प्रभावती कोळेकर यांनी दिली.
कोल्हापूर जिल्हा 291 महाविद्यालय
प्रवेश जागा 70,690
विज्ञान शाखा 32,010
वाणिज्य 16,330
कला शाखा 22,350