10th exam 2026 | दहावीच्या परीक्षेस शुक्रवारपासून प्रारंभ

1 लाख 32 हजार विद्यार्थी; कोल्हापूर विभागात 362 केंद्र
10th exam 2026 |
10th exam 2026 | दहावीच्या परीक्षेस शुक्रवारपासून प्रारंभ
Published on
Updated on

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी दहावीची परीक्षा शुक्रवार (दि. 20) पासून सुरू होणार आहे. परीक्षेसाठी कोल्हापूर विभागीय मंडळांतर्गत 1 लाख 32 हजार 873 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. 362 मुख्य केंद्रांवर परीक्षा होणार आहे. परीक्षेसाठी 14 केंद्र संचालकांसह कर्मचारी बदलण्यात आले आहेत.

कोल्हापूर विभागीय मंडळाकडून दहावीच्या परीक्षेची तयारी पूर्ण झाली आहे. उत्तरपत्रिकांसह गोपनीय साहित्य परीक्षा केंद्रांवर पोहोच झाले आहे. विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याच्या द़ृष्टीने दहावीच्या परीक्षेचे वेळापत्रक तयार केले आहे. परीक्षेदरम्यान महत्त्वाच्या बहुतांश विषयांचा पेपरमध्ये खंड ठेवला आहे. परीक्षांच्या कालावधीत अनेक विद्यार्थी नकारात्मक विचार, भीतीने मानसिक दडपणाखाली येतात, अशा विद्यार्थ्यांसाठी विभागीय मंडळ स्तरावरून समुपदेशकांची नियुक्ती केली आहे.

नियंत्रण कक्ष कार्यरत करून हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. परीक्षा काळातील संभाव्य गैरप्रकारांना आळा बसावा, याद़ृष्टीने विभागीय मंडळामार्फत भरारी पथके नेमण्यात आली आहेत. याशिवाय प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती कार्यरत आहे. विभागीय मंडळात विशेष भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. मंडळ सदस्य व शासकीय अधिकारी यांना परीक्षा केंद्रांना आकस्मिक भेटी देण्याच्या सूचना दिल्या आहेत.

परीक्षा केंद्रापासून 500 मीटर परिसरात झेरॉक्स सेंटर परीक्षा कालावधीत बंद ठेवण्यात येणार आहेत. संबंधित परीक्षा केंद्रांच्या परिसरात 144 कलम लागू करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news