Kolhapur Political Clash | गडहिंग्लजमध्ये दोन गटांच्या कार्यकर्त्यांत हाणामारी : आरळगुंडीत 'स्वाभिमानी'च्या कार्यकर्त्याला मारहाण

Gadhinglaj News | हलकर्णी जिल्हा परिषद मतदार संघातील आरळगुंडी गावामध्ये स्वाभिमानीच्या कार्यकर्त्याला मारहाण
Gadhinglaj Swabhimani worker beaten
गिजवणेमध्ये दोन गटांमध्ये वादावादी झाली Pudhari
Published on
Updated on

Gadhinglaj Swabhimani worker beaten

गडहिंग्लज : गिजवणे जिल्हा परिषद मतदार संघामध्ये फार मोठ्या प्रमाणात चुरस असून यातूनच गिजवणेमध्ये सकाळच्या टप्प्यात वादावादी झाल्यानंतर पुन्हा दुपारी साडेबाराच्या सुमारास या ठिकाणी दोन गटांमध्ये झुंबड उडाली. मतदानासाठी चाललेल्या मतदारांना बोलावण्यावरून व चिन्ह सांगण्यावरून वाद वाढला.

हा वाद इतका वाढला की एकमेकांच्या अंगावर जाऊन मारामारी करण्यापर्यंतचा हा प्रकार वाढला. जमाव मोठ्या प्रमाणात जमा झाल्याने संकेश्वर बांदा या राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अजय सिदकर हे ज्यादा कुमक घेऊन घटनास्थळी पोहोचले.

Gadhinglaj Swabhimani worker beaten
Kolhapur water supply | कोल्हापुरात सोमवारी, मंगळवारी अपुरा पाणीपुरवठा

त्यांनी दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांना सज्जड दम देत अशाप्रकारे पुन्हा प्रकार केल्यास कारवाई करू, असा इशारा दिला . या ठिकाणी राज्य राखीव दलाची पोलीस तुकडी ही मागवण्यात आले असून रात्रीपर्यंत या ठिकाणी सदर तुकडीला थांबण्याच्या आदेश दिले आहेत.

दरम्यान सकाळच्या सत्रात हलकर्णी जिल्हा परिषद मतदार संघातील आरळगुंडी गावामध्ये स्वाभिमानीच्या कार्यकर्त्याला मारहाण झाली. यामध्ये हा कार्यकर्ता जखमी झाला असून त्याबाबत ही पोलिसांच्या कडून चौकशी सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news