

मुरगूड : मुरगूड येथे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजे समरजित घाटगे यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या पदयात्रेस उदंड प्रतिसाद मिळाला. पदयात्रेचा प्रारंभ राजे समरजित घाटगे यांच्या उपस्थितीत येथील ग्रामदैवत अंबाबाई मंदिरात जाऊन अंबाबाईचे दर्शन घेऊन करण्यात आला. दरम्यान, दिवंगत खा. सदाशिवराव मंडलिक आणि हुतात्मा स्मारकास भेट देऊन समरजित घाटगे यांनी नतमस्तक होत अभिवादन केले.
या पदयात्रेदरम्यान देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, समरजित घाटगे आणि महाविकास आघाडीच्या विजयांच्या घोषणांनी एकच आसमंत दुमदुमून गेला होता. यावेळी मुख्य बाजारपेठेतून काढण्यात आलेल्या पदयात्रेस नागरिकांनी दिलेला प्रतिसाद हा उत्साह वाढवणारा तर होताच शिवाय जणू काही या परिवर्तनाची साक्ष देणाराच होता.
यावेळी गोकुळचे माजी अध्यक्ष रणजित पाटील, विश्वजित पाटील, अनंत फर्नांडिस, विलास गुरव, दगडू शेणवी, विजय राजिगरे, सुरेश गोधडे, दत्तामामा खराडे, प्रवीण चौगुले, अमर चौगुले, दत्तामामा जाधव, डॉ. अशोकराव खंडागळे, बजरंग सोनुले यांच्यासह महाविकास आघाडीच्या सर्वच सहयोगी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, कर्मचारी, तरुण वर्ग, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुरगुडकर नागरिकांचा मिळालेल्या अफाट प्रतिसादाने या पदयात्रेचा शेवट येथील मुरगूड नाका येथे करण्यात आले.