Chief Justice Shri Chandrashekhar | सर्किट बेंचचे लवकरच खंडपीठात रूपांतर

मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांचा विश्वास
Chief Justice Shri Chandrashekhar |
Chief Justice Shri Chandrashekhar | सर्किट बेंचचे लवकरच खंडपीठात रूपांतर
Published on
Updated on

कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापुरातील सर्किट बेंचचे लवकरच खंडपीठात रूपांतर होईल, असा विश्वास व्यक्त करत, त्याकरिता आवश्यक पाठपुरावा सुरू असून सकारात्मक पावले उचलली जात असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांनी गुरुवारी सांगितले. यानंतर त्यांनी प्रस्तावित खंडपीठासाठी राखीव शेंडा पार्कातील 23 एकर जागेची पाहणी केली. यास जादा 62 एकर जागा मागणीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.

दोन दिवसांच्या कोल्हापूर दौर्‍यावर आलेले मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांचा सायंकाळी सर्किट बेंच बार असोसिएशन व कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना ते म्हणाले, कोल्हापूर सर्किट बेंचचे खंडपीठात लवकरच रूपांतर होईल. यामुळे युवा सहकारी वकील, महिला वकिलांना करिअरच्या चांगल्या संधी मिळतील. शेवटच्या व्यक्तीला न्याय मिळेपर्यंत चांगले काम करायचे आहे. यासाठी सर्वांचे सहकार्य हवे.

यावेळी डिव्हिजन बेंचचे न्या. माधव जामदार, न्या. ए. एल. पानसरे, न्या. एम. डब्ल्यू. चंदवाणी, न्या. प्रवीण पाटील, न्या. सचिन देशमुख, न्या. रणजित भोसले, महाधिवक्ता मिलिंद साठे, अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग, मुख्य सरकारी वकील शिशिर हिरे, नेहा भिडे, जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष व्ही. आर. पाटील, माजी अध्यक्ष शिवाजीराव राणे, संतोष शहा, अजित मोहिते, मुकुंद मोरे-पाटील उपस्थित होते. सूत्रसंचालन अ‍ॅड. प्रियांका राणे-पाटील यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news