Kolhapur circuit bench | पश्चिम महाराष्ट्रातील ऐतिहासिक वारसा स्थळांच्या संरक्षणासाठी सर्किट बेंचची नोटीस

पुरातत्त्व, राज्य सरकारला दोन दिवसांत ‘स्थिती अहवाल’ सादर करण्याचे आदेश
Kolhapur Circuit Bench |
Kolhapur circuit bench | पश्चिम महाराष्ट्रातील ऐतिहासिक वारसा स्थळांच्या संरक्षणासाठी सर्किट बेंचची नोटीसPudhari File Photo
Published on
Updated on

जमीर पठाण

कुरुंदवाड : पश्चिम महाराष्ट्रातील ऐतिहासिक व पुरातत्त्वदृष्ट्या महत्त्वाच्या वारसास्थळांच्या दुरवस्थेबाबत दाखल झालेल्या जनहित याचिकेची मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने गंभीर दखल घेत भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय, महाराष्ट्र शासन तसेच संबंधित प्रशासकीय यंत्रणांना नोटीस बजावत वारसास्थळांच्या संरक्षणासंदर्भातील सविस्तर ‘स्थिती अहवाल’ दोन दिवसांत सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये न्यायमूर्ती पी. एस. पाटील यांच्या पीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. अ‍ॅड. युवराज पी. नरवणकर यांनी बाजू मांडली आहे. मदत फाऊंडेशनचे प्रशांत साळुंखे यांनी जनहित याचिका दाखल केली असून 12व्या शतकातील शिलाहार-यादवकालीन भूमिज शैलीतील कोपेश्वर मंदिरासह पन्हाळा, विशाळगड, पावनगड, भुदरगड, गगनबावडा किल्ला, ब—ह्मपुरी पुरातत्त्व टेकडी, बाहुबली आणि कृष्णाबाई मंदिर या वारसा स्थळांच्या जतनाकडे होत असलेल्या दुर्लक्षाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. दरम्यान, शुक्रवारी सादर होणार्‍या अहवालावर या वारसा स्थळांच्या संवर्धनाचे भवितव्य अवलंबून असल्याचे मानले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news